अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या आंदोलनाची सरकार दरबारी अद्यापि दखल नाही | दिवस आठवा
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना स्वतःच्या आश्वासनाचा विसर? | कोरोना योद्ध्यांची 'गरज सरो वैद्य मरो' अशी दूरावस्था का?
आंदोलन अधिक तीव्र करणार!...आंदोलकाचा इशारा!
मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : जेजे हॉस्पिटलमधील महाराष्ट्रातील अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस. परंतु शासन दरबारी आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिलेल्या कोरोना योद्ध्यांकडे सरकार दुर्लक्षित करत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना स्वतः त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, असे दिसते.
महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांनी वारंवार निवेदन देऊनही, सेवा नियमित करण्याचा न्याय शासन देत नाही, हे दिसल्यानंतरच आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेले आहेत. जे जे रुग्णालयात गेल्या सात दिवसांपा...










