महाराष्ट्र

बजाज अलियान्झतर्फे आपल्या प्रतिनिधींना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक व्यावसायिक यंत्रणेची उभारणी
महाराष्ट्र

बजाज अलियान्झतर्फे आपल्या प्रतिनिधींना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक व्यावसायिक यंत्रणेची उभारणी

महामारीदरम्यानच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मूल्यवर्धित उत्पादन श्रेणीप्रतिनिधींना ग्राहकांच्या संपर्कात राहाण्यासाठी मदत करणारी कार्यक्षम डिजिटल साधनेनव्या व्यावसायिक वातावरणासाठी प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम मुंबई : कोव्हिड- 19 ने सर्वच उद्योगांच्या व्यावसायिक वातावरणात लक्षणीय बदल घडवले असून त्यात जीवन विमा उद्योगाचाही समावेश आहे. नव्या वातावरणात लॉकडाउनच्या नियमांमुळे वैयक्तिक भेटींचे प्रमाण अतिशय कमी किंवा नगण्य झाले असून या महामारीचा विमा प्रतिनिधींच्या कामावरही मोठा परिणाम झाल्याचे लक्षात येईल. प्रतिनिधींना स्थिर उत्पन्न मिळावे आणि महामारीच्या काळातही त्यांना ग्राहकांच्या संपर्कात राहाता यावे यासाठी बजाज अलियान्झ लाइफ (Bajaj Allianz Life) या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एका कंपनीने काही पावले उचलली होती. त्यामधे ग्राहकां...
पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना मातृशोक
महाराष्ट्र

पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना मातृशोक

अहमदनगर : चांदे बुद्रुक (ता. कर्जत) येथील सुपुत्र व मुंबई पोलिस दलातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्या आई कमल बापुराव वाघमारे (वय ६२) यांचे निधन झाले. पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २८ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, तीन मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत. दरम्यान चांदे बुद्रुक येथे बुधवारी (ता. ६ जानेवारी) दशक्रिया विधी होणार आहे....
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे | अपना वतन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे | अपना वतन संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना पूर्ववत पोलीस संरक्षण द्यावे. अशी मागणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील अत्यंत कष्टातून पुढे आलेलं नाव आहे. त्यांचे आईवडील भूमिहीन शेतकरी होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी स्वतः काम करून शिक्षण पूर्ण करावे लागले. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केले, एलएलबी पदवी मिळवली आणि पुढे फौजदारी कायद्यामध्ये विशेष अभ्यास केला आणि ते वयाच्या ४३ व्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदापर्यंत पोहचले. या पदावर असताना "कांजीलाल प्रेमजीत विरुद्ध क्षेत्रीय वनाधिकारी" खटला असो किंवा "असोसियेटेड बेअरिंग्स विरोधात भारत सरकार" हा खटला असो त्यांचे अन...
सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब मुळे यांचे निधन
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब मुळे यांचे निधन

अहमदनगर : मुळेवाडी (ता. कर्जत) येथील सामाजिक कार्यकर्ते आण्णासाहेब किसन मुळे (वय ६२) यांचे गुरूवारी (ता. ३१ डिसेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे असे अचानक जाण्याने मुळेवाडीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी व सुना-नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक दादासाहेब मुळे व पिंपरी चिंचवड येथील प्रगती शिक्षण संस्था संचलित सौ राणूबाई नागूभाऊ बारणे प्रशाला थेरगावचे मुख्याध्यापक सचिन मुळे यांचे ते वडील होत. मुळे यांचा स्वभाव मनमिळाऊ व उदार असल्याने अनेकांना त्यांच्या निधनाचा धक्का बसला आहे. दरम्यान, नऊ जानेवारी रोजी सिध्देटेक येथे दशक्रिया विधी होणार आहे. ...
एमएमआरडीए प्राधिकरणामध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांची द्वार सभा
महाराष्ट्र, मोठी बातमी

एमएमआरडीए प्राधिकरणामध्ये कर्मचारी-अधिकाऱ्यांची द्वार सभा

"प्राधिकरण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…बाहेरचे हटाव, प्राधिकरण बचाव…" घोषणांनी दणाणला परिसर मुंबई : एम.एम.आर.डी.ए. प्राधिकरणामध्ये द्वार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर आंदोलन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अभूतपूर्व उपस्थितीने प्रचंड गाजले. मागील तीन वर्षांपासून आयुक्त आर. ए. राजीव यांनी एकदाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबधी संघटनेला चर्चेला वेळ दिला नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष आपल्या मागण्यांवर निर्णय न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.काही दिवसांपूर्वी द्वार सभेची संघटनेने नोटीस देऊनही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही,याबद्दलचा राग सर्वांच्या मनामध्ये धगधगत होता, हे आजच्या प्रसंगी दिसून आले. प्राधिकरणाची ढासळती अर्थव्यवस्था याबद्दल सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी सुरक्षा योजना व सेवनिवृत्तीं नंतर वैद्यकिय सुविधा या योजना राबविण्...
Crime News : रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार निघाला दैनिकाचा संपादक
महाराष्ट्र, मोठी बातमी

Crime News : रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार निघाला दैनिकाचा संपादक

अहमदनगर : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार एका आघाडीच्या दैनिकाचा संपादक बाळ ज. बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नगर जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या हत्येची सुपारी ही बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याचे अधीक्षकांनी सांगितले. बोठे याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली आहेत...
बिबट्याच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिवसा वीज?
महाराष्ट्र, मोठी बातमी

बिबट्याच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी दिवसा वीज?

पालकमंत्री हसन मुश्रीफ करणार ऊर्जामंत्र्यांशी चर्चा अहमदनगर : जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांनी मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या प्रकार वाढल्याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली असून बिबट्यांना पकडण्यासाठी अधिक पिंजरे प्राप्त करुन घेण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे टाळण्यासाठी शेतीला दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव व संभाव्य दुसरी लाट, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेले नुकसान व मदतवाटप, जिल्ह्यात बिबट्याचा मानवी वस्तीत वाढलेला वावर आणि त...
महाराष्ट्र

कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी संजय मरकड यांची निवड

पिंपरी : चिंचवड विधानसभा विद्युत वितरण समितीचे अध्यक्ष व आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक संजय मरकड यांची कानिफनाथ मढी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल आमदार लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, सांगवी काळेवाडी मंडलाचे कार्याध्यक्ष माधव मनोरे, सांगवी काळेवाडी मंडलाचे सरचिटणीस दीपक जाधव, उद्योजक विजय कांबळे उपस्थित होते. ...
ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार | राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची घोषणा
मोठी बातमी, महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार | राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची घोषणा

यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभे...
गोठ्याची भिंत उचकटून चांदे खुर्दमध्ये शेळ्यांची चोरी | कर्जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच
महाराष्ट्र

गोठ्याची भिंत उचकटून चांदे खुर्दमध्ये शेळ्यांची चोरी | कर्जत तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच

अहमदनगर : गोठ्याची भिंत फोडून चोरट्यांनी एक शेळी व दोन करडे लंपास केले. ही घटना सोमवारी (ता. १६) रात्री चांदे खुर्द (ता. कर्जत) येथील भोसले वस्ती येथे घडली. किशोर भोसले असे शेळी मालकाचे नाव आहे. भोसले यांच्या घराशेजारीच गोठा असून त्यामध्ये ते जनावरे ठेवत असतात. शेळी व करडांसह इतर जनावरे घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधून भोसले घरामध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी गोठ्याच्या पाठीमागील दगडी भिंत अलगत उचकटून शेळी व दोन करडे चोरून नेले. भोसले यांना सकाळी ही बाब लक्षात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी मुळेवाडी येथे तीन शेळ्यांची तर योगेश मुळे यांच्या घरामध्ये चोरी झाली होती. कर्जत तालुक्यात चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे मोठे आवाहन निर...