Lockdown : माकडांची उपासमार टाळण्यासाठी मराठवाडा जनविकास संघाने उचलला माकडांच्या खाद्याचा भार
उस्मानाबाद : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यांनाही झळ पोहचत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (परांडा) सोनारी येथे माकडांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. येथील कालभैरवनाथ मंदिर सुरक्षिततेसाठी भाविकांसाठी बंद असल्याने माकडांना खायला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व सोनारी ग्रामस्थांच्या वतीने खाद्य पुरविण्यात सुविधा केली आहे.
या सुविधेचा शुभारंभ मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भैरवनाथ अन्नछत्र ट्रस्टचे अध्यक्ष महेश कारकर, कोषाध्यक्ष रविंद्र खुळे, सहसचिव अशोक माने, सदस्य भिमा घाडगे, डोनजे गावचे सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, संतोष भोरे, बापू शिंदे, विलास शिंदे, दिनेश घोगरे, सचिन भोरे, विनायक गंगाविठ्ठल, अक्षय भोरे, अक्षय भोरे अशोक भोरे, चंद्रकांत भोरे, हनुमंत ...