डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा – अभिनेते देशमुख
लोकमराठी न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली सर्व पुस्तके वाचून घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करा. असे आवाहन डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारलेले अभिनेते सागर देशमुख यांनी जनतेला केले आहे.
दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र, सद्या परिस्थितीत समस्त भारतीयांनी, त्यांच्या अनुयायांनी आपल्या घरातच राहून त्यांच्या प्रती आपली श्रद्धा व प्रेम अर्पण करावे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी कोरोनाचे पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांच्या हितासाठी जे निर्देश दिले आहेत. त्यांचे पालन करीत घरातच राहण्याचे आवाहन...