महाराष्ट्र

एनयुजेएम तर्फे नाशिक जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; परिषदेचा माध्यमांप्रती असलेल्या उदासीनतेबाबत निषेध
महाराष्ट्र

एनयुजेएम तर्फे नाशिक जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; परिषदेचा माध्यमांप्रती असलेल्या उदासीनतेबाबत निषेध

नाशिक, (लोकमराठी) : भारतीय लोकशाहीचे संसद, न्यायपालिका प्रशासन हे तीन आधारस्तंभ असून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तीनही स्तभांचे कामकाज जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमे कार्यरत आहेत. याच अनुशंगाने गुरुवारी (ता. 2 डिसेंबर) जिल्हापरिषदेतील निवडणुकीच्या वार्तांकनासाठी राज्यपातळीवरील माध्यमांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली असता रावसाहेब थोरात सभागृहात त्यांना येण्यास परवानगी नाकारण्यात आली. सभागृहाच्या शेजारी 10 बाय 10 च्या छोट्या धूळ, घाण, कचरा, तुटक्या खुर्च्या, टेबलने भरलेल्या रूममध्ये उभे राहून वार्तांकन करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. पर्याय नसल्याने सुमारे 45 प्रतिनिधिनी या रुममध्ये उभे राहून वार्तांकन करीत नाशिक जिल्हा परिषदेची बातमी संपूर्ण राज्यात पोहचविली. नाशिक जिल्हा परिषदेने निवडणुकीदरम्यान केलेली ही अक्षम्य चूक आम्ही जनतेच्या द...
हल्लेखोर गुटखामाफियांना अटक व कठोर कारवाईची गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी
महाराष्ट्र

हल्लेखोर गुटखामाफियांना अटक व कठोर कारवाईची गृहमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा जालन्यात दाखल एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने पेालीस अधिक्षकांचा सत्कार लोकमराठी न्यूज : हल्लेखोर गुटखामाफियांना तातडीने अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली असल्याचे अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले. पत्रकार विकास बागडी यांच्यावर २९ नोव्हेंबर रोजी गुटखा माफियांनी भ्याड हल्ला केला. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा जालन्यात दाखल केला. त्यामुळे पत्रकारांच्या वतीने पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांचा सत्कार करण्यात आला. राज्यातील विविध भागात निर्भिड पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. या संदर्भात सरकारने कठोर भुमिका घेत पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा पारीत करुन पत्रकारांना संरक्षण दिले आहे...
भेसळयुक्त मद्यविक्रीस बळी पडू नका; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन
महाराष्ट्र

भेसळयुक्त मद्यविक्रीस बळी पडू नका; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

मुंबई : नामांकित कंपन्यांच्या नावमुद्रेखाली उच्च प्रतीचे मद्य माफक दरात विक्रीच्या नावाखाली बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्यविक्रीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले असून दोषीवर कठोर कारवाई केली आहे. नाताळ व नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत बऱ्याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच) ‘डयुटी फ्री स्कॉच’ च्या नावाने बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीचे प्रकार झाले आहेत. अशा विक्रीपासून सावध राहण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. त्याचबरोबर अशा मद्यसेवनाने आरोग्यावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो. भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शु...
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा
महाराष्ट्र, मोठी बातमी

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधिमंडळात घोषणा

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर 2019 पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख या कमाल मर्यादेपर्यंत लाभ मिळणार आहे. विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकी शासनाच्या वतीने भरुन त्यांना कर्जमुक्त करण्यात येईल. याच कालावधीमध्ये उचल केलेले पीक पुनर्गठित कर्जाची मुद्दल व व्याजासह असलेली थकबाकीची रक्कमसुद्धा या योजनेसाठी पात्र असेल. या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन लाख महत्तम मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल. मार्च ...
भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे
महाराष्ट्र, मोठी बातमी

भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही – राज ठाकरे

पुणे : "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही," असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी या परिषदेत जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं मत या अधिवेशनात मांडू, असं ते यावेळी म्हणाले. "भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरून आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही." असे राज ठाकरे एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज देशात जी दंगलसदृश परिस्थिती आहे. त्या करणाऱ्या किती लोकांनी ही स्थिती माहिती आहे. देशातल्या आर्थिक मंदीवरून लोकांचं लक्ष उडवण...
धान खरेदीत दिरंगाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
महाराष्ट्र

धान खरेदीत दिरंगाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

नागपूर, (लोकमराठी) : शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील केंद्रे तातडीने सुरु करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनला दिले. याबरोबरच धान खरेदीत दिरंगाई होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले. भंडारा जिल्हा सहकारी कृषी औद्योगिक संघाला 2019-20 या खरीप हंगामाकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी योजनअंतर्गत मिटेवाणी, बघेडा, बेळगाव, भंडारा,वरठी व कांद्री येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्याच्या परवानगीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी श्री. पटोले यांनी शेतकऱ्यांची धान खरेदी तातडीने सुरु करण्याचे निर्देश दिले. अवकाळी पाऊस आणि लांबलेल्या धान खरेदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी खरेदीसंदर्भात झालेल्या दिरंगाईबाबत संबंधितांवर जबाबदारी...
काविळीचं पिवळं जग राम कदमांना दिसतंय – नवाब मलिक
महाराष्ट्र, राजकारण

काविळीचं पिवळं जग राम कदमांना दिसतंय – नवाब मलिक

विधानसभेतील कामकाजाचे नियम राम कदम यांनी समजून घ्यावेत मुंबई : कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी केली आहे. आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत असा टोलाही आमदार नवाब मलिक यांनी लगावला आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) ३० दिवस आधी देणे अपेक्षित असते. सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात याची माहितीही नवाब मलिक यांनी करुन दिली. कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी राम कदम यांना करुन दिली आहे....
पुण्यातील गहुंजे बलात्कार, खून प्रकरणात राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात
मोठी बातमी, महाराष्ट्र

पुण्यातील गहुंजे बलात्कार, खून प्रकरणात राज्य महिला आयोग सर्वोच्च न्यायालयात

फाशी रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला नसल्याचा युक्तिवादविनंती पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वीकारण्याचे सरन्यायाधीशांना साकडे मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच विशेष याचिका म्हणून स्वाधिकारे स्वीकारावे, अशी विनंतीही आयोगाने केली आहे. “फाशी रद्द करणे म्हणजे पीडितेला न्याय नाकारणे आणि तसा अधिकार उच्च न्यायालयाला नाही,” असा युक्तिवाद आयोगाने केला आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी देशाचे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांना पाठविलेल्या या पत्रामध्ये गहुंजे बलात्कार व खून प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेण्याची विनंती केली ...
सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे संपादक डॉ. रवींद्र रसाळ यांचे निधन
महाराष्ट्र

सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे संपादक डॉ. रवींद्र रसाळ यांचे निधन

परभणी (लोकमराठी) : दैनिक 'गोदातीर समाचार'चे माजी संपादक डॉ. रवींद्र रसाळ (वय ७५) यांचे (दि. ८ डिसेंबर) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ह्रदयविकाराने परभणी येथे निधन झाले आहे. गोदातीर समाचारच्या स्थापनेनंतरच्या काळापासून गोदातीर समाचारचा विस्तार करणे, सायकलवरून फिरून बातम्या गोळा करणे, खेडोपाडी वार्ताहर तयार करणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेणे, वार्ताहरांच्या बातम्यांवर संपादकीय संस्कार करणे, बातम्यांचे प्रूफ्स तपासणे, वर्तमानपत्रांचे गठ्ठे बांधणे, एसटीला गावोगावचे पार्सल टाकणे अशी कामेही त्यांनी केली. तसेच ते एक तत्त्वचिंतक संपादक होते. कुठल्याही विषयाच्या मुळापर्यंत जाऊनच ते लिहीत. विज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय होता. भूकंपावरही त्यांचे संशोधन होते. कश्मीर प्रश्नावर त्यांनी कितीतरी संपादकीय लेख लिहिले व उपायही सुचविले होते. मराठवाड्यातील साहित्यिक पिढी घडविण्यातही त्यांचा मोठा व...
अनुसुचित जमातीच्या शेतकरी वर्गासाठी मोगरा शितगृह युनीटचे होणार वाटप
महाराष्ट्र

अनुसुचित जमातीच्या शेतकरी वर्गासाठी मोगरा शितगृह युनीटचे होणार वाटप

पालघर (लोकमराठी) : शेतकऱ्यांच्या मोगरा पिकाची योग्य साठवणुक व्यवस्था कमी क्षेत्रात निर्माण करुन त्या पीकाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी अनुसुचित जमातीच्या शेतकरी वर्गासाठी मोगरा शितगृह युनीटचे वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी किंमत मिळवुन देण्यासाठी मागील 5ते10वर्षामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील मोगरा लागवड योजनेचा लाभ मिळालेल्या अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या महिला बचत गटाला /शेतकरी उत्पादक गट तयार असल्यास किंवा उत्पादक गट तयार करुन त्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275(1) योजने अंतर्गत मोगरा शितगृह युनीट पुरवठा करण्यात येणार असुन सदर युनीट वापरासंबंधीत सर्व माहिती तज्ञ मार्गदर्शकांकडुन देण्यात येणार आहे. सदर युनिटच्या दुरुस्ती देखभालीची 18 महीण्यापर्यंतची वॉरंटी असेल सदर योजनेसाठी दि.09.12.2019 ते दि.18.12.2019 पर्यंत अर्ज सा...