राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी
राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी
पुणे : क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने राजीव परीख यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.येत्या १ एप्रिल पासून ते पदभार स्वीकारतील.
यावेळी क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच ५१ शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते.
२०१९ -२१ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मुं...