प्रियकराबरोबरच्या शरीरसंबंधामुळे तिने केली आईची हत्या
हैदराबाद, (लोकमराठी) : येथील रंजीता हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये आपण आईची हत्या केल्याची कबुली देणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने मित्राच्या दबावाखाली येऊन गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या किर्ती रेड्डी या तरुणीचे प्रियकर बाल रेड्डीबरोबर शारीरीक संबंध होते. ही गोष्ट किर्तीच्या शेजरी राहणाऱ्या शशीला ठाऊक होती. यावरुनच तो तिला पैश्यांची मागणी करत ब्लॅकमेल करत होता. याच दबावाला बळी पडून किर्तीने आपल्याचा आईची हत्या केली.
या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती आणि बाल यांचे शरीरसंबंध असल्याची माहिती शशीला होती. यावरुनच तो किर्तीला कायम ब्लॅकमेल करत असे. “१० लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या आईला तुमच्या दोघांबद्दल सगळं काही सांगेन,” अशी ध...