निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश
मुंबई (लोकमराठी) : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, तेथील उद्योगांचे कामकाज, कार्यप्रणालीतील सुटसुटीतपणा, निर्यातवाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, रोजगार निर्मिती आदी विविध बाबींचा आढावा संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी विकास आयुक्त सिप्ज-सेझ श्रीमती मिता राजीव लोचन तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.बैठकीत सुरुवातीला विकास आयुक्त श्रीमती लोचन यांनी महाराष्ट्र, गोवा, दमन, दिव या परिमंडळातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या प्रगतीचा तसेच उद्योगवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, कार्यप्रणाल...