पाणी पुरवठा विषयी शहर महिला कॉंग्रेसचे गुरुवारी पिंपरीत आंदोलन
पिंपरी (दि. २२ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पवना धरणातून आणि काही भागात एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी पवना धरण शंभर टक्के भरले होते. शहरात २४x७ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासन आणि पदाधिका-यांनी अनेकवेळा दिले होते. अद्यापही शहरात अनियमित आणि अवेळी अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. या विषयावर दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने मनपा भवनावर जन आंदोलन करीत हंडा मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी पुढील पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करु असे महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले होते.
आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या प्रशासनाने अद्यापही पाणी पुरवठ्याबाबत गांभिर्य दाखविलेले नाही. याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २४ मार्च) सकाळी १०:३० वाजता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने भा...










