औंध रावेत बीआरटी रस्त्यावर होणाऱ्या शंभर कोटींची उधळपट्टी थांबवा – राहुल कलाटे
https://youtu.be/imvbi7YfxlA
४० कोटींचे काम थेट पद्धतीने दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा
पिंपरी : औंध रावेत बीआरटी मार्ग रस्ता सुस्थितीत असतानाही येथे नागरिकांच्या करातील शंभर कोटी रुपयांची उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांसमवेत या मार्गाचा पाहणी दौरा केला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कलाटे बोलत होते.
कलाटे यावेळी म्हणाले की, हा रस्ता बनविताना पुढील पंचवीस वर्षे चे नियोजन केले होते त्यावेळी दोनशे कोटी खर्च केला होता आता सुशभिकरणाच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांची रक्कम अनाठायी खर्च करण्याचे नियोजन आयुक्त राजेश पाटील का करीत आहेत. यामधे सांगवी फाटा ते कावेरीनगर रस्ता, डांगे चौक ते ताथवडे रस्ता आणि औंध ते रावेत या रस्त्यांचे डांबरीकरण आणि...










