यशस्वी संस्थेच्या आयआयएमएस च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (आयआयएमएस) वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी हिताची एस्टेमो ब्रेक सिस्टिम्स इंडिया प्रा.लि.चे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक संजय आंभोरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर यशस्वी संस्थेच्या 'यशोगाथा' विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
तसेच प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ई-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह या उपक्रमांतर्गत यशस्वी संस्थेतील सदस्यांनी तसेच अन्य नागरिकांनी जमा केलेल्या वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रातिनिधिक स्वरूपात पुर्नवापरासाठी तसेच योग्य पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी सामाजिक संस्थेला देण्यासाठी समन्वयक पवन शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
जिल्हा ...










