पिंपरी चिंचवड

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन
आरोग्य, पिंपरी चिंचवड

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन

चिंचवड : मंथन फाउंडेशन, रिलीफ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण केंद्र, पुणे, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघवी केशरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिंचवड येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यात आली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्याख्यान दिले. युवक युवती यांना एचआयव्ही म्हणजे काय? एड्स व एचआयव्ही मधील फरक समजून सांगितला. एचआयव्ही कसा होतो, त्याचा इतिहास यावर माहिती दिली. तसेच एचआयव्ही चाचणी सर्व सरकारी रुग्णालय व काही एचआयव्हीवर काम करणाऱ्या संस्था मोफत तपासणी करतात व त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घेतली पाहिजे, ती काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एचआयव्हीबाबत युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. संवेदनशील झाले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षित राहून, जीवन...
काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन
पिंपरी चिंचवड, नोकरीविषयक

काळेवाडीतील नोकरी महोत्सवाचा १८०० तरूणांनी घेतला लाभ; १०१ जणांना थेट नोकरी | प्रभागातील तरूणांसाठी डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्यातर्फे करण्यात आले होते आयोजन

काळेवाडी : वाढती बेरोजगारी व कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या अनुषंगाने युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अक्षय गंगाराम माने यांच्या वतीने काळेवाडीत भव्य नोकरी महोत्सवाचे गुरूवारी (ता. ९) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रभागातील सुमारे १८०० जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये १०१ जणांना थेट नोकरी मिळाली आहे. डॉ. माने यांनी सामाजिक बांधिलकी जपत सतत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची जनसेवा सुरू आहे. अनेक जण सुशिक्षित असूनही नोकरी लागत नाहीत. ते सतत नोकरीच्या शोधात असतात. नोकरी नसल्यामुळे कुटुंब चिंतेत असते. ही बाब लक्षात घेत तसेच ही समस्या सोडवण्यासाठी डॉ. अक्षय माने यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर हा नोकरी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात उत्पादन, वाणिज्य व वित्तीय संस्था, बीपीओ, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा प्रशिक्षण, वाहननिर्मित...
काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर | रहिवासी सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित

पिंपरी : काळेवाडीतील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या नित्याच्याच आहे. मात्र, विजयनगर भागातील सोसायट्यांमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला असून अनेक सदनिकाधारक आपली सदनिका विकून पिंपळे सौदागर भागात स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. तर काहींनी सदनिका विकल्या असल्याची माहिती पुढे येत आहे. काळेवाडीतील विजयनगर परिसरात अनेक सोसायट्या असून या सोसायट्यांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यात कमी दाबाने व दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे या सोसायट्यांना टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. याबाबत महापालिकेला सांगूनही दखल घेतली जात नाही. परिणामी अनेक सदनिकाधारक स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, काळेवाडीतील विजयनगर, पवनानगर, आदर्शनगर कोकाणेनगर, जमा मस्जिद परिसरात देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परिसरात राहणारे ना...
आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे
पिंपरी चिंचवड, राजकारण

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे

पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगीत केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकावर या विषयी आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. आता सर्व पक्षिय नेत्यांवर आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर ओबीसी समजाचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीगावपातळीपासून पुन्हा ओबीसींचे मजबूत संघटन उभे करु या अशी हाक माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे यांनी केले. मंगळवारी (दि. 7 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसींच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक भोसरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वसंत लोंढे बोलत होते. यावेळी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रताप गुरव, आनंदा कुदळे, पी. के. महाजन, वंदना जाधव, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, शहर महिला...
महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – रविकांत वरपे
पिंपरी चिंचवड, राजकारण

महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – रविकांत वरपे

राष्ट्रवादी युवकची मनपा निवडणूकपुर्व आढावा बैठक संपन्न पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली २०१७ ते २०२१ या कालावधीत युवक कॉंग्रेसचे उत्कृष्ट काम झाले आहे. महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीचा पर्दाफाश वेळोवेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केला आहे. आता यात अधिक आक्रमकपणा आणि सातत्य ठेवून २०२२ च्या सार्वत्रिक निवडणूकांना पुर्ण क्षमतेने सामोरे जाऊन महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले. बुधवारी (दि. ८ डिसेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खराळवाडी पिंपरी येथिल कार्यालयात शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली २०२२ च्या निवडणुकीच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. य...
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठांचा सत्कार

पिंपरी : काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा २४ वा वर्धापन दिनानिमित्त 'एक दिवस ज्येष्ठांच्या सन्मानाचा' हा आनंद सोहळा ज्योतीबा मंगल कार्यालय येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी गायिका रोहिणी घोडेकर प्रस्तुत स्वररंग मराठी, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रम आयोजित केला होता. प्रथम गणेश पुजन करून महापौर उषा माई ढोरे, उपमहापौर हिराबाई हुले, कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत कुमार गुजर, संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष अरूण बागडे, कार्याध्यक्ष वृषाली मरळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, सुरेश नढे पाटील, नगरसेविका निता पाडळे, उषा काळे, सविता खुळे, सुनीता तापकीर व अश्विनी तापकीर, ज्योती भारती हरेश नखाते, सजी वर्की, बाबा जगताप, काळुराम नढे, बाळासाहेब नढे, सोमनाथ तापकीर, किरण नढे, मच्छिंद्र ता...
पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला, मनोज, गौरी, सुनिल यांना प्रथम क्रमांक
क्रीडा, पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉनमध्ये शर्मिला, मनोज, गौरी, सुनिल यांना प्रथम क्रमांक

उन्नती सोशल फाऊंडेशन व शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद पिंपरी : पिंपळे सौदागर येथे आयोजित केलेल्या "पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन" २१ किमी स्पर्धेत शर्मिला संतोष आणि मनोज यादव यांनी प्रथम क्रमांक तर खुल्या गटात गौरी गुमास्ते आणि सुनिल शिवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून रोख पारितोषिक पटकाविले. रविवारी (ता. ५ डिसेंबर) उन्नती सोशल फाऊंडेशन, किशान स्पोर्ट्स इंडिया प्रा. लि. व नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच यशदा रियाल्टी ग्रुप यांच्या सहकार्याने हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की, "गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने शारीरिक व मानसिक महत्त्व अधोरेखित केले आहे. सुदृढ शरीर व सक्षम मन बनविण्यासाठी धावणे हा एक उत्तम व दर्जेदार व्यायाम आहे. केवळ खेळ म्हणून...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन
पिंपरी चिंचवड

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन

पिंपरी : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्यासाठी मार्गदर्शक आहेत. समस्त बहुजन समाजाचे उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्या विचारांवर चालण्याचा निर्धार करू असे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची मान उंचावली, अर्थातच गोरगरीब बहुजन समाजातील जनतेने हे विचार आत्मसात करत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले पाहिजे बहुजन समाजाची मुलं डॉक्ट...
विप्ला फाउंडेशन व एचएसबीसी टेक्नॉलॉजिस्ट यांच्यातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

विप्ला फाउंडेशन व एचएसबीसी टेक्नॉलॉजिस्ट यांच्यातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : विप्ला फाउंडेशन आणि एच एस बी सी टेक्नॉलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा, कळस, रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घरकाम, बांधकाम मजुर व दगड, वीट, मातीकाम मजुरी करणाऱ्या ५२० कुटुंबाना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रविण कदम, प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रा. दिपक जाधव, प्रा. वैशाली गायकवाड यांचे हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या प्रा. वैशाली गायकवाड म्हणाल्या की, "उपेक्षित वस्तीतील १८ ते ३० वयोगटातील युवती महिलांना संगणक, व्यवसाय प्रशिक्षणाचे (RETAIL, BPO) कोर्स पुणे आणि पिंपरी येथे सुरू केलेले आहेत. त्यांना किमान उत्पन्नाची हमी देणाऱ्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, आणि त्यांचे सक्षमीकरण केले जाते." प्रा. दिपक जाधव म्हणाले की," कच्च्या घरात निवास करणाऱ्या...
नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

नायजेरियातून पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव; सहा जणांना झाली लागण

पिंपरी : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित (Mutation) विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केलेले असून त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.‍ दि. २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकुण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर ‍तिघे त्यांचे निकटसहवासित आहेत.नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्य...