सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा “डल्ला”
संग्रहित छायाचित्र
किमान वेतनापासून महिला सफाई कामगार वंचितच; ठेकेदारांवर कारवाई कोण करणार?
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'फ' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत झाडलोट सफाई कामगार महिला हे गेली १५ वर्षापासून कार्यरत आहेत, संबंधित ठेकेदाराकडून किमान वेतना नुसार पगार दिला जात नाही, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, संबंधित ठेकेदाराने सर्व महिला कांमगारांचे 'एटीएम' कार्ड ठेकेदाराकडेच ठेवले आहेत, त्यामुळे झाडलोट करणारे सफाई महिला कामगार महिलांच्या वेतनावर ठेकेदार डल्ला मारत असुन सफाई कामगार महिलांची पिळवणूक केली जात आहे, उन्हातान्हात कबाड कष्ट करून देखील या महिलांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कोण करणार असा सवाल बहुजन सम्राट सेना डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
या कंत्राटी महिला कामगारांना अनेक समस्यांचा सामना क...