पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर

पिंपरी चिंचवड : काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी पदमाकर जांभळे तर उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाची निवडनुक प्रक्रिया नुकतीच शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघातील १३० ज्येष्ठ नागरिक संघापैकी गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या ६६५ महिला व पुरुष वृद्ध सभासदांनाबरोबर घेऊन उत्कृष्ट कार्यालयीन कामगिरी व वृद्धांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या काळेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा शहरातील ज्येष्ठ नागरिक महासंघात नाव लौकिक आहे. या आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुक प्रक्रियेत खालील प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी पदमाकर जांभळे आणि उपाध्यक्षपदी सुखदेव खेडकर, महिला उपाध्यक्षपदी शुभांगी देसाई, सचिवपदी प्रल्हाद गांगूर्डे, सहसचिव सुरेश विटकर खजिनदार मारूती महाजन, सहखजिनदार गंगाधर घाडगे यांची निवड झाली....
पिंपरी चिंचवड महापालिका शाळा आयएसओ मानांकित करा – दिपक चखाले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

पिंपरी चिंचवड महापालिका शाळा आयएसओ मानांकित करा – दिपक चखाले

पिंपरी : शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळांचे आयएसओ मानांकित करण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत जवळपास १४० ते १४५ प्राथमिक शाळा सुरु आहेत. यामधे मराठी शाळा १२८ तर इंग्रजी शाळा ९ व उर्दू ७ शाळा आहेत. या शाळेमधे शक्यतो गरीब, सर्वसामान्यांचे विशेष करून झोपडपट्टीत राहणारे मुले-मुली झ देशाच मोठ्या प्रमाणात शिकत आहेत. या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत आहे का? तसेच स्वच्छता, आरोग्य व पिण्याचे स्वच्छ पाणी, खेळाचे मैदान, अशा अनेक गोष्टी आहेत का? नेमके किती मुले-मुली या शाळेत शिकत आहेत, व ते शिक्षण घेताना दिसतात का? त्यांची बौद्धिक व शारीरिक प्रगती झाली आहे का? किती मुले परिस्...
सहायक आयुक्त राजाराम पाटील यांच्या बदलीने..गहिवरले पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय!
पिंपरी चिंचवड

सहायक आयुक्त राजाराम पाटील यांच्या बदलीने..गहिवरले पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय!

पिंपरी : शासकिय कर्मचारी यांची बदली होणे हे क्रमप्राप्त असते. कामाचा तो एक भाग असतो. मात्र .. काही शासकिय अधिकारी असे असतात की, त्यांची इतरत्र बदली होणे, हि गोष्ट मनाला पटणे. तेथील त्यांचे सहकारी तसेच संपर्कात आलेली मंडळी यांना काही काळासाठी तरी कठीण होऊन जाते. असेच काहीसं .. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त राजाराम (तात्या) पाटील यांच्या बाबतीत पाहावयास मिळत आहे. सहायक पोलीस आयुक्त पाटील यांची बदली कोल्हापूर या ठिकाणी झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहकारी यांना अक्षरशः गहिवरुन आले असल्याचे चित्र आहे.. पोलीस म्हटलं की, सर्वसामान्यांच्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. करडी नजर, आवाजातील कणखरपणा, चालण्याची बोलण्याची वेगळी लकब .. असे काहीसे चित्र असते. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे या गोष्टी...
चोरीचा माल खरेदी करणारा निघाला भाजप नगरसेविकेचा पती
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

चोरीचा माल खरेदी करणारा निघाला भाजप नगरसेविकेचा पती

पिंपरी चिंचवड : कंपनीमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना महाळुंगे पोलीसांनी १२ तासात अटक केली. विशेष म्हणजे या चोरट्यांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका भाजप नगरसेविकेच्या पतीदेवाचा समावेश आहे. तो अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.. इम्रान शौकतअली बागवान (वय-19 वर्ष रा. पंचमोहनी ता.इटक जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश), इम्रान मुस्तफा हुसेन ( वय-20 वर्ष रा. रमवापुर ता. तुलसीपुर जि.गौंडा उत्तरप्रदेश) आणि रणजित राजेंद्र चव्हाण ( वय-23 वर्ष रा. कंकरापाल, ता. केराकड जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर नगरसेविकेचा पती बापु घोलप (यमुनानगर, निगडी) आणि रशीद (भंगारवाला रा. चाकण) अशी फरार आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अमोल प्रकाश डोबळे (वय-36 रा. सावरदरी, चाकण) यांनी फिर्याद दिली. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माह...
मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

मा. आमदार आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशनतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पिंपरी चिंचवड : काळेवाडी रहाटणी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा मा. आमदार अध्यक्ष ॲाफ इंडीया केमिस्ट असोसिएशन व महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशन यांच्या हस्ते पार पडला. त्यामुळे मा. आमदार जगन्नाथ ऊर्फ आप्पासाहेब शिंदे, केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्ट उपाध्यक्ष विवेक तापकीर, परविंदरसिंग बाध, स्वप्नील जंगम, आशिष परमार, तेजस साळवी, म्हाळप्पा दुधभाते, केतन थोरात, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते....
काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक
पिंपरी चिंचवड

काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत अनन्या, अग्रजा, दिया, भूमिकाने पटकावला प्रथम क्रमांक

काळेवाडी : काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत वेगवेगळ्या चार वयोगटातील प्रथम क्रमांक अनन्या पाल, अग्रजा सदावर्ते, दिया सोमाणी व भूमिका क्षीरसागर यांनी पटकावला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा रविवारी बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला. काळेवाडीतील हॅपी थॉटस बिल्डिंग येथे पार पडलेल्या या सोहळ्यात काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचे सदस्य प्रदीप हाटे, सुरेश पाटील, प्रवीण अहिर, दिलीप भोई, वैभव घुगे, सोमनाथ पवार, खेमचंद तीलवानी, आशा इंगळे, शुभाष कांबळे, अशोक उत्तेकर, अनिल देसाई, सूनंदाताई काळे, अमित देशमुख, किशोर अहिर, बाबासाहेब जगताप, अमोल भोसले व संघटनेचे इतर सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच पिंपरी चिंचवड सिटिझन फोरमचे राजीव भावसार व तुषार शिंदे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथी...
श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी?

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राज्य सरकार व स्थानिक पोलिस यंत्रणेशी पत्रव्यवहार तसेच आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहे. मात्र हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिस प्रशासन दबाव आणत, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी केला. याबाबत त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिस पोलिस आयुक्त आयुक्त कृष्णा कृष्ण प्रकाश यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी मला शुक्रवारी (ता. 22) पोलिस ठाण्यात बोलावले. पोलिस ठाण्यात गेलो असता त्याठिकाणी आलेल्या सहायक सहायक पोलीस आयुक्ताने माझा मोबाईल काढून घेतला. मोठ्या आवाजात उर्मट भाषेचा वापर करत बोलण्यास सुरूवात केली. तसेच त्या व्हिडिओ मध्ये शिवाजी महाराजांची बदनामी झालेली नाही. त्य...
विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा – सचिन साठे
पिंपरी चिंचवड

विचारांवर निष्ठा ठेऊन काम करा – सचिन साठे

पिंपरी : समाज सेवा आणि राजकारणात प्रवेश करताना युवकांनी व्यक्ती पेक्षा विचारांवर निष्ठा ठेवून काम केले तर निश्चितच यश मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त साठे यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या निवडक कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी साठे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे आणि शाम अगरवाल, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, हरीदास नायर, भाऊसाहेब मुगूटमल, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परश...
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल सेक्रेटरी अॅड. श्रीमान राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी व शाळा समितीचे अध्यक्ष श्रीमान अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत करुन सामुहिक उद्देशिकेचे वाचन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सावळे शोभा यांनी केले. विद्यालयाच्या प्राचार्य सुनिता नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या मनोगतातून स्वातंत्र्य समता व बंधुता या मूल्यांची आठवण करून दिली. Covid-19 चा प्रादुर्भा वर आपला देश यशस्वीपणे मात करत आहे हाच आपला खरा प्रजासत्ताकाचा विजय आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य गुंजाळ अनिल, उपमुख्याध्यापिका जैन मनीषा, पर्यवेक्षक देवक...
प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे चित्रकला स्पर्धा | ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे चित्रकला स्पर्धा | ५२० विद्यार्थ्यांचा सहभाग

काळेवाडी : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५२० विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. एकुण आठ ठिकाणी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, बक्षीस वितरण सोहळा पुढील आठवड्यात होणार असल्याचे प्रवीण अहिर यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत कोरोनामुळे पसरलेला हाहाकारामुळे मानवी जीवनाची झालेली अवस्था व अश्यातच स्वत:ची सुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता, लस शोधण्यात भारतीय संशोधकांनी मारलेली यशस्वी मजल, लसीकरणाचा चालू असलेला प्रवास आणि याचेच एक फलित म्हणजे शाळा सुरू करण्याबाबतचा झालेला निर्णय. या निर्णयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांना कुठेतरी एक शाळेची व आपल्या सवंगड्याची व वर्गमित्रंची गाठभेट व्हावी व ती एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून व्हावी यासाठी काळेवाडी रेसिडेंट वेलफेअर असोस...