शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्तांचा मनाई आदेश
पिंपरी : शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ काळेवाडी या संस्थेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये असा मनाई आदेश पुणे विभागाचे अतिरिक्त धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिलेला आहे.
दरम्यान, शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ९ जून २०१९ रोजी संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळ निवडले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून चंद्रकात तापकीर, सचिवपदी मल्हारीशेठ तापकीर व इतर पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे.
संस्थेच्या वतीने कै श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, एल.बी.टी. इंग्लिश मेडियम स्कूल,तापकीरनगर काळेवाडी, पुणे व श्री भैरवनाथ माध्यामिक विद्यालय, मु.पो.ओझर्डे.ता.मावळ जि.पुणे ह्या शाळा चालविण्यात येतात.
परंतु संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे नवीन संचालक मंडळाला ...










