पिंपरी चिंचवड

सायबर सेक्युरिटी विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा
पिंपरी चिंचवड

सायबर सेक्युरिटी विषयावर राजर्षी शाहू महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळा

ताथवडे (लोकमराठी) : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा शिरकाव होत आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे या विश्वात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहावे. सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी शिक्षकांनी सायबर सुरक्षादूत (अँम्बेसेडर) व्हावे, असे आवाहन सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाते. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात, ताथवडे येथे सायबर सेक्युरिटी या विषयावर राष्ट्रीय पातळीवर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन लाभत आहे. प्रस्तुत कार्यक्रमाचे उद्घाटन सायबर सेल पिंपरी चिंचवड चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक माननीय विवेक मुगळीकर यांच्या हस...
रिक्षा परमिटसाठी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक
पिंपरी चिंचवड

रिक्षा परमिटसाठी बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा ‘युनिट ए’ची कारवाई १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त पिंपरी (लोकमराठी) : परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची एकूण ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या टोळीकडून एकूण १८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली.अशोक भीमराव जोगदंड (वय ३७, रा. निगडी), बालाजी अशोक माशाळकर (वय ४०, रा. काळेवाडी), सचिन महादू साळवे (वय ३५, रा. तळवडे), मुकुंद दत्तू पवार (वय ३०, रा. निगडी), रामदास मच्छिंद्र हारपुडे (वय ३५, रा. चिखली), किरण रामभाऊ ढोबळे (वय २६, रा. भोसरी), खेतमल नामदेव पाटील (वय ३६, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले...
महापालिका आयुक्तांकडून शहरातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

महापालिका आयुक्तांकडून शहरातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन

पिंपरी चिंचवड : अपना वतन संघटनेच्या वतीने शहरातील कचरा समस्येविषयी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या घरासमोर 'डस्टबीन' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि. १५) ४ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये अपना वतन संघटनेच्या वतीने अनेक मुद्दे मांडण्यात आले. या अर्ध्या तासातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे : १) शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असून त्याचे ढीगच्या ढीग लागले आहेत. उदा - काळेवाडी, थेरगाव, वाकड, निगडी, चिंचवड, भोसरी परिसरात २) शहरातील सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणवर कचरा अनेक दिवसांपासून पडलेला आहे. उदा - रोझ लॅन्ड सोसायटी, माँर्ट व्हर्ट सोसायटी इत्यादी ३) शहरातील झ...
कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. काहीही असले तरी आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवारपर्यंत (दि. १३) तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार (दि. १४) सकाळी १० वाजता आयुक्त हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी दिला आहे. १ जुलै पासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए. जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन्यांन...
प्राध्यापक केतन देसले यांचा ‘यंग लीडरशीप इन एज्युकेशन’ पुरस्काराने गौरव
पिंपरी चिंचवड

प्राध्यापक केतन देसले यांचा ‘यंग लीडरशीप इन एज्युकेशन’ पुरस्काराने गौरव

डॉ. एच. के . सरदाना यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा. केतन देसले. पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (पीसीसीओई) संगणक विभागाचे प्रा. केतन देसले यांचा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाचे मुख्य संशोधक (CSIR-CSIO) डॉ. एच. के. सरदाना यांच्या हस्ते 'यंग लीडरशीप इन एज्युकेशन 2019' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आयआयटी पटना आणि टेक प्रोलॅब्ज (TechProlabz) यांच्या संयुक्त विद्यमाने "इंडियन एज्युकेशन ॲवॉर्ड 2019" चे आयोजन नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रा. देसले यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. प्रा. देसले हे पीसीसीओईआरमध्ये संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्...
वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार : रामदास फुटाणे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार : रामदास फुटाणे

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : कान्होपात्राला क्लिओपात्रा करण्याचे स्वप्न दाखविणा-या मोजक्या भांडवलदारांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था केंद्रीत होत आहे. देशामध्ये व्यक्ति, पक्ष महत्वाचा नसून देशातील 90 टक्के संपत्ती 10 टक्के भांडवलदारांच्या हातात जात आहे. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. देशाला सनातनी, धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादापासून वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार आहे, असे प्रतिपादन रामदास फुटाणे यांनी चिंचवड येथे केले. ज्येष्ठ नगरसेवक व पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 एप्रिल) ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत शहरातील साहित्य, कला, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेर...
प्राधिकरणाकडे ‘रिंगरोड’च्या जागेचा ताबा नसताना बेकायदेशीर अतिक्रिमण कारवाई
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

प्राधिकरणाकडे ‘रिंगरोड’च्या जागेचा ताबा नसताना बेकायदेशीर अतिक्रिमण कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची रहाटणी येथील नियोजित एचसीएमटीआर (रिंगरोड) प्रकल्पाची जागा अद्याप जिल्हाधिकार्‍यांमार्फत ताब्यात आलेली नसताना त्या जागेवर प्राधिकरणाने अतिक्रमण कारवाई केली आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या व महापालिकेच्या सुनावणी दरम्यान उघड झाली आहे. प्राधिकरण व महानगरपालिकेच्या या अन्यायकारक कारवाई विरोधात स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीने लढा उभारला आहे, अशी माहिती स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीचे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी पिंपरीत गुरुवारी (25 एप्रिल 2019) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गौरव धनवे, हेमलता लांडे, विजय लोट, खंडेराव जमादार, सतीश काळे,सविता लोयरे, बालाजी ढगे आदी उपस्थित होते. लॅण्ड ऍक्वीजीशन कायद्यान्वये कलम 11 नुसार प्राधिकरणाने 5 वर्षाच्या आत नोटीस काढणे क्रमप्राप्त होते. परंतु; ती ...
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, राजकारण

सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा : लोकशाही बचाव समिती

पिंपरी चिंचवड : 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. सुरु असणा-या लोकसभा निवडणुकीत या विषयी एकही शब्द न काढता विनाकारण नको ते मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. 2014मध्ये त्यांनी दिलेल्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवून देशभरातील जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली होती. मात्र आता जनतेचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. असा सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप सेना युतीला सुज्ञ मतदारांनी पराभूत करावे, असे आवाहन लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे यांनी पिंपरी येथे केले. लोकशाही बचाव समितीच्या वतीने पिंपरीमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी नगरस...
थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा
पिंपरी चिंचवड, राजकारण

थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगाव मधील बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. थेरगाव मधील निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगाव मधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळी बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगाव मध्ये अनेक प्रश्न आहेत मात्र कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्या...
बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे 117 कर्मचा-यांपैकी 28 लिपिकांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्या कर्मचा-यांचे वर्ग ड चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त...