तरुणांना बेरोजगारीच्या गर्तेत लोटणाऱ्या राज्यसरकारला निवडणुकीत बेरोजगारच अद्दल घडवतील – अजित गव्हाणे
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी, ता. २२ (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात बेरोजगारी किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे याचे दाहक वास्तव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पद भरती प्रक्रियेने दाखवून दिले. महापालिकेने मागविलेल्या 386 पदांसाठी 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे वास्तव शहरातीलच नव्हे तर राज्यातील बेरोजगारीचे विदारक चित्र दाखवते. इथली बेरोजगारी काही प्रमाणात कमी करू शकणारा 'वेदांत-फॉक्सकॉन' प्रकल्प गुजरातच्या पायाशी वाहणाऱ्या कर्मदरिद्री शासनाला हे बेरोजगारच निवडणुकीत मतदानाच्या रूपाने अद्दल घडवतील आणि याची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरापासूनच होणार, अशी सडेतोड प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध 386 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले असता तब्बल 1 लाख 30 हज...