पिंपरी चिंचवड

एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?
पिंपरी चिंचवड, राजकारण

एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?

https://youtu.be/_JpU4RHrFnc रिक्षा सोबत असलेल्या फोटो संदर्भात अजित पवार यांचा बाबा कांबळे यांना फोन पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षा सोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोन करून 'बाबा तो फोटो तुझाच आहे का?' अशी विचारणा करत व्हायरल फोटो मागील सत्य जाणून घेतले. रिक्षा चालक-मालक, घरेलू कामगार महिला, पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे नेतृत्व बाबा कांबळे यांचे आहे. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन करत महापालिका प्रशासन, राज्य शासनाला धारेवर धरून अनेकांना...
Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त उत्सव चिन्हाचे अनावरण
पिंपरी चिंचवड

Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त उत्सव चिन्हाचे अनावरण

https://youtu.be/sz4ueZGCU0U पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त मंडळाच्या उत्सव चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच लोकमान्य टिळक जयंती निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन व मंडपचे पुजन करण्यात आले. रविंद्र शिंदे, विशाल चव्हाण, रोहित शिंदे, जशवंत दाभांडे, संकेत गुजर, उमेश गांधी, केतन चव्हाण, आशीष जगताप, प्रतीक मोरे, प्रवीण शिंदे, गणेश कुंभार, अजिंक्य शिंदे, राजेन्द्र काम्बले, निलेश कुंभार, सूरज कुंभार, नयानदेव हांडे, शंकर सूर्यवंशी, मनिष चव्हाण, कल्पेश गांधी, गणेश भंडालकर, ओम कुंभार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. दरम्यान मंडप सजावटीचे काम आशीष जगताप मागील १० वर्षापासून करत आहेत. मंडळाच्या वतीने या वर्षी सर्व कार्यकर्त्यांना अध्यक्ष मानण्याचा निर्णय घेतला असल्याचे रोहित शिंदे यांनी लोकमराठ...
काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड, सामाजिक

काळेवाडीत मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी घेतला लाभ

पिंपरी : काळेवाडी (Kalewadi) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबीराचा १०१ जणांनी लाभ घेतला. त्यामध्ये चार मोती बिंदूचे रूग्ण सापडले असून त्यांची लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच यावेळी चष्मेही वाटप करण्यात आले. अशी माहिती शिबिराचे संयोजक शेख इरफान अब्दुल रहीम यांनी दिली. डॉ. निलेश चाकणे (Dr Nilesh Chakane), डॉ. पुनित सिंग (Dr. Punit K Singh), रजिया पठाण यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, हज्रात पटेल, शकील शेख, साजिद शेख, हाजीमलंग शेख, सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर, श्रीकांत पारखी, शरद राणे, रवी राहते, राजू राहते, अनिल कदम, सुधाकर नलावडे, आशिफ शेख, इकबाल पठाण, अहमद मोमीन, चंद्रजिरी, राजीव पिल्लई, दीपक चव्हाण, मदन पुरोहित, अनिल हातणकर, प्रकाश ताम्हणकर आदी उपस्थित होते. याबाबत इरफान शेख म्हणाले की, एकूण १०१ लोकांनी सहभाग...
लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ
पिंपरी चिंचवड

लोकोपयोगी उपक्रमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागरिकांशी जोडणार नाळ

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा निर्धारयुवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पुढाकाराने 46 प्रभागात कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील 46 प्रभागात विविध लोकोपयोगी उपक्रमातून नागरिकांशी नाळ जोडण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा निर्धार करण्यात आला आहे. शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन कार्यक्रमाची आखणी केली आहे. शहरातील शेवटच्या नागरिकांना वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदैव तत्पर आहे. लोकांची कामे करणे, अजित दादा पवार यांच्या विचारधारेवर आणि विकासाच्या पावलावर पाऊल ठेवून युवक आघाडी वाटचाल करणार आहे. त्यासाठी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे अयोजन केले...
महापालिकेच्या धोरणाविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष उभारणार व्यापक आंदोलन
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या धोरणाविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष उभारणार व्यापक आंदोलन

पिंपरी : शहरातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची बैठक मंगळवारी (ता. १९) आकुर्डी येथील श्रमशक्ति भवन येथे पार पडली. या बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या समाजविरोधी धोरणावर चर्चा करण्यात आली. पुढील व्यापक आंदोलनाची दिशा ठरविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मारुती भापकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव राजेश ढावरे, सचिव सुरेश गायकवाड, कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रकाश जाधव, प्रदीप पवार, भाऊसाहेब आडागळे, आनंदा कुदळे, अपना वतन संघटनेचे हमिद शेख, राजश्री शिरवळकर, मानव अधिकारचे फतिमा अंसारी, शिवशाही व्यापारी महासंघाचे युवराज दाखले, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, संजय जाधव, दीपक...
शहरातील असंख्य खड्ड्यांमध्ये दडले मोठे अर्थकारण ; शहरातील खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे – आप
पिंपरी चिंचवड

शहरातील असंख्य खड्ड्यांमध्ये दडले मोठे अर्थकारण ; शहरातील खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे – आप

जाणीव पुर्वक निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे रस्त्यावर खड्डे- आपचा आरोप लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार यांची रोजगार हमी योजना आहे काय? आपचा सवाल रिजेक्शन चार्जेस लावून मोफत दुरुस्ती करून घ्यावी : चेतन बेंद्रे पिंपरी चिंचवड : महापालिकेचा बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते बांधतो. या रस्त्यांचे बांधकाम नेहमीप्रमाणे निकृष्ट दर्जाचेच केले जाते. रस्ते विकास ही अहोरात्र सुरू असणारी रोजगार योजना लोकप्रतिनिधी, अधिकारी, आणि ठेकेदारयांनी राबवली आहे. महापालिकेचे सुमारे ६००० कोटींचे बजेट आहे. त्यातील सुमारे १२०० ते १५०० कोटी रूपये फक्त स्थापत्य कामासाठी आहेत. स्मार्ट सिटीच्या नियोजनात करदात्यांना खड्डे मुक्त रस्ते मिळावेत अशी अपेक्षा असते. मुळात या शहरात किती रस्ते आहेत याचे हिस्ट्री कार्ड आता नागरिकांना मिळाले पाहिजे. २०१७ पासून शहरात उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण, डांबरीकरण यासाठी अहो...
आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण, पिंपरी चिंचवड

आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी, ता. २० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) महिला उपशहराध्यक्षा सुनिता केशव गायकवाड व कार्यकर्ता कांता दत्तु मोरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम व महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, विठ्ठल शिंदे, दहीतुले अण्णा, अर्जुन लांडगे, आकाश शिंदे, किरण नढे, जुबेर खान आदी उपस्थित होते....
पाचवे दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पाचवे दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न

बैंक ऑफ बडोदा प्रायोजक तत्वावर सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी केला संयुक्तरित्या संकल्प पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 20 जुलै 2022 रोजी सप्तर्षी फाऊंडेशनच्या विभागीय कार्यालयात विषेश (दिव्यांग) मुलांकरीता मोफत चौथे होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जातात. नोंद...
पिंपरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २२० नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २२० नागरिकांनी घेतला लाभ

विरोधी पक्षनेते अजित पवार व ज्येष्ठ नेते योगेश बहेल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शिबिराचे आयोजन पिंपरी, ता. १७ : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच शहराचे ज्येष्ठ नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरी येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालय येथे प्रभाग क्रमांक १७ व १८ मधील सुमारे २२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये कान, नाक, घसा व नेत्र आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना योगेश बहेल (Yogesh Behal) म्हणाले की, "पिंपरी चिंचवडचे विकास पुरुष विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सर्व सेल तर्फे शहरात येत्या पूर्ण महिनाभर लोकोपयोग...
पत्रकार संजय शिंदे यांना पितृशोक
पिंपरी चिंचवड

पत्रकार संजय शिंदे यांना पितृशोक

पिंपरी : संपतराव गणपतराव शिंदे (वय ८३) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने शिराळा (जि. सांगली) येथे निधन झाले. पिंपरी चिंचवडचे जेष्ठ पत्रकार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांचे ते वडील होत. संपतराव शिंदे यांचा शिराळा येथे विविध सामाजिक, राजकीय कामात मोलाचा सहभाग होता. शिराळा तालुक्यातील विविध कारखाने, मंदिर उभारणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे....