पिंपरी चिंचवड

PIMPRI : शिवसेनेतर्फे काळेवाडीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

PIMPRI : शिवसेनेतर्फे काळेवाडीत महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी, दि. 8 (प्रतिनिधी) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रहाटणी काळेवाडी विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी महिलांना दुपट्टा वाटप करण्यात आला. त्यावळी योग गुरु सुरेश विटकर, सुजाता हरेश नखाते, तसलीम शेख, दत्तात्रय भट, एकनाथ मंजाळ, एकनाथ काटे, लक्ष्मण टोणपे, शंकर जाधव, आरोग्य अधिकारी आत्माराम फडतरे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले. तर आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले....
Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad : ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ महानाट्यातून उलडणार येशू ख्रिस्ताचे दुखःसहन

‘फेथ ग्रुप'कडून विनाशुल्क सादरीकरण पिंपरी : ‘गुड फ्रायडे’ सणाच्या पार्श्‍वभूमीवर फेथ ग्रुप च्यावतीने बायबलवर आधारित वधस्तंभवार खिळलेला येशूचा जीवन प्रवास ‘द पॅशन ऑफ ख्राईस्ट’ या मराठी महानाट्यातून दाखविण्यात येणार आहे. राखेच्या बुधवार (ता.५)पासून (ॲश वेनेस्डे) ख्रिस्ती बांधवांच्या चाळीस दिवसांच्या उपवास काळाला सुरूवात झाली आहे. त्‍यामुळे ख्रिस्ती बांधवांसाठी हे नाटक आनंदाची पर्वणी ठरणार आहे. चिंचवडमधील सेंट ॲन्ड्र्युज हायस्‍कुलच्या मैदानावर रविवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे. या महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत करणार आहे. ‘वधस्तंभावर खिळलेला येशू आणि पुर्नरूत्थानाच्या दिवशी शिष्यांना दर्शन' असा येशू ख्रिस्ताचा जीवन प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव समाज बांधवांना घेता येणार आहे. ‘वधस्तंभावरील मरण यातना सहन करूनही प्रभू येशूने शांतता, मानवता ...
PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. सुरेंद्र साहेबराव जाधव (५६) असे अटक केलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाल्हेकरवाडी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाच ४ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आली. दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मंडला...
HSRP : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

HSRP : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) - हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार असून, यासाठी ३० एप्रिलची मुदत वाढ देण्यात आली आहे. सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्र, जुन्या वाहनधारकांनी अशा प्रकारची नंबर प्लेट लवकर बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. या नंबर प्लेटसाठी देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. या प्लेटवर होलोग्राम स्टिकर, इंजिन, चेसिस क्रमांक प्रेसिंगद्वारे तयार केलेले असते. त्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यात वाढ करून ती ३० एप्रिल करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेम...
RAHATNI : श्री स्वामी समर्थ अनंत मठ, मुख्य शक्तीपीठ येथे द्वैत-अद्वैत सोहळा संपन्न
पिंपरी चिंचवड

RAHATNI : श्री स्वामी समर्थ अनंत मठ, मुख्य शक्तीपीठ येथे द्वैत-अद्वैत सोहळा संपन्न

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) - शिवराज नगर, रहाटणी येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठ, मुख्य शक्तिपीठाचे संस्थापक सद्गुरु अनंत पोतदार महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त द्वैत अद्वैत संगम तथा भक्ती शक्ती संगम सोहळा संपन्न झाला. या द्वैत अद्वैत संगम सोहळ्यासाठी अनंत पोतदार महाराजांनी स्थापन केलेल्या दौंडज, काळेवाडी, वासुंदे व गुंजाळवाडी येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठ, शक्तिपीठांचे मुख्य कार्यवाह सपत्नीक उपस्थित होते. चारही शक्तिपीठांचे मुख्य कार्यवाह व इतर शेकडो स्वामी भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्या प्रसंगी पहाटे श्री स्वामी समर्थांची मूर्ती व सद्गुरु अनंत पोतदार महाराजांच्या समधीला वेद मंत्रोच्चारात सर्व प्रथम गुरू माऊली काकींच्या शुभ हस्ते व अनंत मठाच्या सेवक संघाच्या सदस्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्या नंतर योगेश बोरले यांनी सपत्नीक सर्व शक्तिपीठांच्या स्वा...
PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी

भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील (Jijamata Hospital) रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे (Sayali Nadhe) यांनी केला होता. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात दोन महिन्यात १८ लाख ६६ हजार ३८८ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिता श्रीरंग साळवे (Dr Sunita Salve) व लिपिक आकाश प्रदीप गोसावी (Akash Gosavi) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी करण्यात आली. तर लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. जिजाम...
PIMPRI : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी
पिंपरी चिंचवड

PIMPRI : भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) - कॉंग्रेसच्या प्रचारात सहभागी होणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्याची धमकी भाजपचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhanjay Mahadik) यांनी दिली आहे. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत पिंपरी चिंचवड शहरात महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावेळी माजी नगरसेविका निगार बारस्कर, स्वाती शिंदे, शबाना शेख, आशा भोसले, महाराष्ट्र प्रदेश एन. एस. यु. आय.चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, एन. एस. यु. आय.चे उपाध्यक्ष उमेश खंदारे, महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, संदेश नवले, आबा खराडे, हिरामण देवकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर टीका करताना चक्क महि...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत मोरया पुरस्काराचे परीक्षण

मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना करण्यात येते सन्मानित पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून विशिष्ट नियमांच्या अधिन राहून मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटराव पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांची परीक्षणे करण्यात आली. गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी आवश्यक परवानग्या सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला नाविन्यपूर्ण संदेश देणारे उपक्रम डीजे ऐवजी परंपरागत वाद्यांचा वापर विसर्जन मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का? तसेच वैशिष्ट्यपूर्ण जन...
पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
पिंपरी चिंचवड

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे

महिला काँग्रेसचे महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन पिंपरी, दि. १७ : पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर लाईन व नाले सफाई तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती व विद्युत डीपी बॉक्स दुरुस्ती करा. अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महिला काँग्रेसने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे, उपाध्यक्षा आशा भोसले, परिवहन विभागाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा स्वाती शिंदे उपस्थित होत्या. महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील महावितरणच्या विद्युत ...
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

लोकमराठी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ व हिरकणी महिला संघाने आयोजित केलेला २८ वा वर्धापन दिन, स्नेहमेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत पार पडला. दिघी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती समाजसेवा संघाचे मुख्य प्रवर्तक सुभाष पवार, अनिल मोरे, सुनील साळुंखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन करण्यात आले. यावेळी संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी सोनाटे, शांताराम बापू पवार, रमेश साळुंखे, रमेश सपकाळ, सहदेव भोसले, शिवाजी निकम, मधुकर पार्टे, माजी अध्यक्ष संतोष चिकणे व सर्व विभागीय सदस्य, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निगडी येथील भक्ती-शक्ती येथे स्वच्छता मोहीम, वृ...