पिंपरी चिंचवड

पाणी पुरवठा विषयी शहर महिला कॉंग्रेसचे गुरुवारी पिंपरीत आंदोलन
पिंपरी चिंचवड

पाणी पुरवठा विषयी शहर महिला कॉंग्रेसचे गुरुवारी पिंपरीत आंदोलन

पिंपरी (दि. २२ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पवना धरणातून आणि काही भागात एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी पवना धरण शंभर टक्के भरले होते. शहरात २४x७ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासन आणि पदाधिका-यांनी अनेकवेळा दिले होते. अद्यापही शहरात अनियमित आणि अवेळी अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. या विषयावर दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने मनपा भवनावर जन आंदोलन करीत हंडा मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी पुढील पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करु असे महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले होते. आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या प्रशासनाने अद्यापही पाणी पुरवठ्याबाबत गांभिर्य दाखविलेले नाही. याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २४ मार्च) सकाळी १०:३० वाजता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने भा...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त महापालिकेतर्फे संत तुकोबाराय यांना अभिवादन
पिंपरी चिंचवड

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त महापालिकेतर्फे संत तुकोबाराय यांना अभिवादन

पिंपरी, दि.२० मार्च २०२२ : जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकोबाराय यांना अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या पिंपरी मधील संत तुकारामनगर येथील पुतळ्यास तसेच निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्पास महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य जितेंद्र ननावरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती मायला खत्री, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र बहल, वसंत शेवडे, नंदू कदम, माधुरी आंबेकर, वर्षा जगताप, माणिक अहिरराव, हरिभाऊ करमाळकर, सुभाष कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. निगडीतील भक्ती शक्ती येथील कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अ क्षेत्रीय अधिकारी...
राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सुनील कुसाळकर यांचा पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण, पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते सुनील कुसाळकर यांचा पक्ष कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : तूर्तास लांबणीवर पडलेल्या परंतु, अचानक कधीही होऊ घातलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. त्याच अनुषंगाने जाधववाडी चिखली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे युवा कार्यकर्ते आणि सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष सुनील कुसाळकर यांनी पक्ष कार्यालयात प्रभाग क्रमांक तीनमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनील कुसाळकर हे आपल्या खास शैलीमध्ये सामाजिक कार्य आणि युवक वर्गामध्ये फेमस आहेत. त्यांना युवकांचा खूप मोठा पाठिंबा आहे. आणि म्हणून अशा धाडसी आणि डॅशिंग नेतृत्वाला महानगरपालिके मध्ये काम करण्याची संधी मिळावी अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. आणि त्याच उद्देशाने सुनील कुसाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयामध्ये दाखल केला आहे. याप्रसंगी याप्रसंगी राष्ट्रवादी का...
PCMC : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या जनसंवाद सभा
पिंपरी चिंचवड

PCMC : सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या जनसंवाद सभा

पिंपरी, ता. २० मार्च : शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या(सोमवारी) सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा होणार आहे. याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकारी नियुक्त केले असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत. नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्याचा निर्णय प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी घेतलाआहे. याकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या करण्य...
सोसायटीतील नागरीक उत्सवानिमित्त एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवितात – कुंदाताई भिसे..
पिंपरी चिंचवड

सोसायटीतील नागरीक उत्सवानिमित्त एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवितात – कुंदाताई भिसे..

पिंपळे सौदागर येथील विविध सोसायटीत होळी आणि धुलीवंदन सण आज मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. लहानांबरोबरच मोठ्यांनी एकमेकांना रंग लावून, रंगाची उधळण करत, आनंदोत्सव साजरा केला. परिसरातील रोझ आयकॉन सोसायटी, कुणाल आयकॉन, जरवरी, रोसलँड, लक्षदीप पॅलेस, राजवीर पॅलेस, अलको सोसायटी, दीपमाला अशा विविध सोसायट्यांमध्ये व उन्नति सोशल फाउंडेशन येथे ज्येष्ठ नागरिक व आनंद हास्य क्लब सोबत खास धुलीवंदनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने नागरीक उत्सवात सहभागी झाले होते. उन्नती सोशल फाउंडेशन तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी परीसरातील प्रत्येक सोसायटीत प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच होळी आणि रंगांचे महत्व नागरिकांना पटवून दिले. सोसायटीतील नागरीक उत्सवानिमित्त एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवितात. त्यामुळेच...
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दृष्टिहीन बांधवांसह धूलिवंदनाचा आंनद लुटला.
पिंपरी चिंचवड

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दृष्टिहीन बांधवांसह धूलिवंदनाचा आंनद लुटला.

पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचे केले आवाहन. पिंपरी :- डोळ्यात दाटलेल्या अंधारातून उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या दृष्टिहीन व्यक्तीना बरोबर घेऊन रंगांची उधळण करणारा धूलिवंदनाचा सण पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आनंदात साजरा केला.दृष्टिहीन व्यक्तीकडे दृष्टी नाही मात्र दूरदृष्टी आहे.रंगांची ओळख नसली तरीही या व्यक्ती आयुष्यात सप्तरंग भरत असतात.यासाठी आपण त्यांच्या कडून खुप काही शिकायला हवे व पर्यावरण पुरक होळी व रंग पंचमी हे सण साजरे करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. चिंचवड मधील पोलीस आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आस्था हँडीक्राफ्ट्स मधील दृष्टिहीन बांधव या वेळी उपस्थित होते.अमृता क्षेत्रे या विद्यार्थिनीने प्रार्थनेतून सर्वांना मंत्र मुग्ध केले. दृष्टिहीन असलेल्या संदीप भालेराव,अशोक जाधव,तृप्ती भालेराव,गोरख घनवट य...
सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?

https://youtu.be/aGgooUJBCu0 रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : वीज बिलात तोडपाणी करत वीज मीटरच गायब करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. सुमारे सव्वा वर्षांच्या काळात महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयातून १८ हजार ७७० वीज मीटर बदलून दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा महावितरणचा महाघोटाळा असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लोकमराठी न्यूजशी बोलताना रोचिरमानी म्हणाले की, कोरोना काळात अंदाजे रिडींगद्वारे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलात तोडपाणी करत पिंपरीतील महावितरणचे काही अधिकारी व कर्मचारी वीज मीटर गायब करतात, त्यांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी स्वतः बळीचा बकरा झालो. त्यासाठी माझेही जास्त आलेले बिल कमी करून...
महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवजयंती महोत्सवाचे पिंपरीत आयोजन
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवजयंती महोत्सवाचे पिंपरीत आयोजन

जिजाऊंच्या लेकिंच्या हस्ते होणार शिवस्मारकाचे अनावरण शनिवारी आणि रविवारी ऐतिहासिक महानाट्य शिवसह्याद्रिचे आयोजन अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजंयती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीनिमित्त फाल्गुन वद्य तृतीया सोमवारी (दि. २१ मार्च) पिंपरी गावातील भैरवनाथ मंदिर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री शिवमुर्तीस दुग्धाभिषेक ; ८ वाजता होमहवन व जन्मोत्सव पाळणा ; मानकरी महिलांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजता शगुन चौक ते पिंपरी शिवस्मारकापर्यंत भव्य पालखी सोहळा ; सायंकाळी ५:३० वाजता शिवराज्याभिषेकाच्या भव्यदिव्य सोहळ्याचे जिवंत सादरीकरण आणि सायंकाळी ६ वाजता जिजाऊंच्या लेकिंच्या हस्ते भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पारंपारिक वाद्य, ढोल पथक आणि फटाक्यांची आतषबा...
खेळ रंगला गृहलक्ष्मीचा संगे पैठणीचा’ कार्यक्रम अजमेरा कॉलनी आणि खराळवाडी येथे संपन्न
पिंपरी चिंचवड

खेळ रंगला गृहलक्ष्मीचा संगे पैठणीचा’ कार्यक्रम अजमेरा कॉलनी आणि खराळवाडी येथे संपन्न

निर्मला कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मालती मोहिते आणि सुनिता राजपूत यांना मिळाली स्कुटी पेप जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका निर्मला सद्‌गुरु कदम यांनी खराळवाडी बालभवन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या क्रीडांगणावर आणि डॉ. मनिषा सुमंत गरुड (गायकवाड) यांनी अजमेरा कॉलनी येथिल डॉ. केशव हेडगेवार क्रीडा संकुल येथे ‘खेळ रंगला गृहलक्ष्मीचा संगे पैठणीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लकी ड्रॉ व्दारे स्कुटी पेपसह इतर दहा बक्षिसे, शंभर पेक्षा जास्त पैठणी आणि प्रत्येक बरोबरच्या उत्तरास चांदिचे नाणे ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया मराठे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक सद्‌गुरु कदम, माजी नगरसेविका निर्मला सद्‌गुरु कद...
तुकाराम बीज निमित्त भोसरीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी चिंचवड

तुकाराम बीज निमित्त भोसरीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन दिवस तुकाराम बीज म्हणून भक्ती भावाने नामस्मरण करीत विविध धार्मिक कार्यक्रमाने सर्वत्र साजरा केला जातो.भोसरी संत तुकाराम नगर येथे पाण्याच्या टाकी जवळ श्री वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर २० ऑक्टोबर २०२१ उभारण्यात आले आहे. या मंदिरातील मुर्तीची प्रतिष्ठापना शांतीब्रम्ह हभप मारोती महाराज कु-हेकर आणि कलशारोहण हभप केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तुकाराम बीज निमित्त या ठिकाणी शनिवारी (दि. १९ मार्च) दुपारी ३ वाजता ४५ भजनी मंडळांचा सहभाग असणारी दिंडी काढण्यात येणार आहे. भोसरी आळंदी रोड, संत तुकाराम नगर पाण्याच्या टाकी जवळ मंदिरापासून भोसरी आळंदी रोड - दिघी रोड परिसरात दिंडीचा मार्ग असेल. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील आणि हभप सोपान...