अपना वतन संघटनेच्या पाठपुराव्याला | सोनिगरा रिअलकॉन बिल्डरला पावणेतीन कोटीची दंड
तब्बल ११ महिने पाठपुरावा केल्यानंतर मुळशी तहसीलदारांना आली जाग
पिंपरी चिंचवड : शहरामध्ये अनेक बिल्डर गौणखनिज उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणावर गौणखनिज उत्खनन करीत आहेत. अनेक बिल्डर तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्याशी संगनमत करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत. डांगे चौक, गुजरनगर येथील सोनिगरा रिअलकॉन या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना गौणखनिज उत्खनन केल्याबाबतची तक्रार अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी २७ जानेवारी २०२१ रोजी केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींवर दुर्लक्ष केले होते. परंतु अपना वतन संघटनेच्या वतीने पुन्हा १९ ऑक्टोबर २०२१ रोजी तहसीलदार मुळशी यांना संबंधित बिल्डरवर कारवाई बाबत पत्र दिले होते.
यांनंतरही कारवाई न झाल्याने शेवटी मुळशी तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यास होत असलेली टाळाटाळ व दिरंगाई बा...










