पिंपरी चिंचवड

आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे – डॉ. अक्षय माने
पिंपरी चिंचवड

आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे – डॉ. अक्षय माने

काळेवाडीत आरोग्य तपासणी शिबिराचा २३०० नागरिकांनी घेतला लाभ काळेवाडी : आजच्या धकाधकीच्या काळात शरीरासह मानवी मनावर देखील मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यामुळे निरोगी शरीरासाठी आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे बनले आहे. असे मत डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. काळेवाडीतील विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय माने यांच्या सहकार्यातून प्रभागातील नागरिकांसाठी नुकतेच भव्य आरोग्य व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे २३०० नागरिकांनी सहभाग घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तर सुमारे ७० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. प्रभागातील नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अल्पदरात चष्मे वाटप, वजन कमी करण्याचे उपाय, रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी यांचा लाभ घेतला. या का...
आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे-वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा – प्रा. दिपक जाधव
पिंपरी चिंचवड, सामाजिक

आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे-वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा – प्रा. दिपक जाधव

चिंचवड : आजच्या काळात आधुनिक इलेक्ट्रिकल साधनांमुळे पाटे, वरवंटे स्वयंपाक घरातून इतिहास जमा होत आहेत. असे मत प्रा. दिपक जाधव यांनी येथे व्यक्त केले. येथील मुंबई-पुणे महामार्गालगत पाथरवट समाजातील कुटुंबाना विप्ला फाउंडेशनच्या शिक्षक दाम्पत्याने किराणा किट वाटप केले. त्यावेळी प्रा. जाधव बोलत होते. संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक प्रवीण कदम, प्रकल्प प्रमुख जैद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे प्रा. दिपक जाधव आणि प्रा. वैशाली गायकवाड या शिक्षक दाम्पत्याने छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या स्वयंपाक घरातील पाटा, वरवंटा, खलबत्ता आदी साधने बनवणाऱ्या येथील पाथरवट समाजातील कुटुंबाना ४० किराणा किट वितरित केले. प्रा. जाधव म्हणाले की, "शहरात गेली २० वर्षे पाथरवट समाज पाटा, वरवंटा टिकवण्यासाठी फुटपाथवर छिन्नी हातोडीच्या घाव टाकून साधने बनावत आहे. जनतेने स्वयंपाक घरामध्ये एखादा पाटा, वरवंटा खरेद...
राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही – प्रा. गणेश ढाकणे
पिंपरी चिंचवड, राजकारण

राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही – प्रा. गणेश ढाकणे

पिंपरी : जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यांमध्ये कोणत्याही निवडणुका घेऊ देणार नाही. असा इशारा प्रा. गणेश आर ढाकणे यांनी येथे दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शुक्रवारी राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रा. ढाकणे बोलत होते. या आंदोलनात अरुण पवार, आनंदा कुदळे, विशाल जाधव, कैलास सानप, अमोल नागरगोजे, विशाल वाळुंजकर, गणेश ढाकणे, गणेश वाळुंकर, सुरेश गायकवाड, संजय गायके, जितेंद्र बांगर, विजय सोनवणे, सचिन बांगर, बाळासाहेब लटपटे, दादासाहेब दहिफळे, मिलिंद ठाकर, विष्णू कुऱ्हाडे, सोमनाथ काशीद, रोहन सुरवसे, विलास गडदे, तुकाराम सुरवसे, बळीराम सर, सुनील जायभाय, चंदन केदार, उद्धव सानप, हनुमंत आर घुगे यांच्यासह शहरातील विविध संघटनांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. प्रा. ढाकणे म्हणाले की, जर आरक्षण मिळणार नसेल तर ओबीसी शांत बसणार न...
नगरसेवक समीर मासुळकर यांच्या सहकार्याने व मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नाने नवीन डीपी बॉक्स
पिंपरी चिंचवड

नगरसेवक समीर मासुळकर यांच्या सहकार्याने व मानवता हिताय सोशल फाउंडेशनच्या प्रयत्नाने नवीन डीपी बॉक्स

पिंपरी : खराळवाडीतील पापय्या चाळ येथे गेल्या अनेक वर्षापासून खुल्या अवस्थेतील जुन्या विद्युत डीपीतून वायरिंगचा गुंता झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. त्यांना कुठल्याही प्रकाराची मदत मिळत नसल्यामुळे नागरिकांनी मानवता हिताय सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व समाजसेवक धनराजसिंग चौधरी आणि उपाध्यक्ष विशाल वाली यांच्याशी संपर्क साधला. याबाबत तत्परता दाखवत मानवता हिताय संस्थेने सदर विषयाची दखल घेत महावितरणशी संपर्क साधत नवीन डीपी बसविण्याचे काम सुरु केले. तसेच नगरसेवक समीर मासूळकर यांना निवेदन देत डीपीच्या कामासाठी लागणारी उपयोगी उपकरणे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल धनराजसिंग चौधरी यांनी नगरसेवक समीर मासूळकर व महावितरणचे अधिकारी व कामगाऱ्यांचे आभार मानले....
मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड | वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड | वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

https://youtu.be/fVNe0wIKhdI पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या चारचाकी वाहनाची आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने तोडफोड केली. या घटनेमुळे काळेवाडी तसेच शहरातील मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून काळेवाडी परिसरातही चांगलीच खळबळ उडाली आहे. या तोडफोडीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिता पांचाळ यांचे चारचाकी वाहन काळेवाडी येथील पाचपीर चौक येथे त्यांच्या राहत्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. पहाटे चार ते सव्वाचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कोयत्याच्या सहाय्याने पांचाळ यांच्या गाडीवर वार करीत गाडीच्या काचा फोडल्या. ही घटना कळताच ...
कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा १२०० जणांना लाभ
पिंपरी चिंचवड

कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा १२०० जणांना लाभ

पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त रहाटणी येथे आयोजित केलेल्या मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा सुमारे १२०० नागरिकांनी लाभ घेतला. कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मधुमेह, थायरॉइड, किडनीचे विकार, लिव्हरचे विकार, हृदय विकार, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या ॲक्युप्रेशर थेरपी उपचार पद्धतीचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक कैलास थोपटे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता कारभारी, प्रकाश गायकवाड, सखाराम रानवडे, माणिक थोरात, संतोष परसे, रघुनाथ जठार, विजय निकम, नंदू पाटील, विकास थोपटे, प्रदीप चौधरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्य...
आम आदमी पार्टी आयोजित ‘आपला चषक २०२१’ मध्ये ६४ पैकी चार संघांनी मारली बाजी
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टी आयोजित ‘आपला चषक २०२१’ मध्ये ६४ पैकी चार संघांनी मारली बाजी

पिंपरी : आम आदमी पार्टी आयोजित पिंपरी चिंचवड शहर स्तरीय 'आपला चषक 2021' प्लास्टिक बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड मनपा शाळेच्या मैदानात संपन्न झाल्या. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धा मध्ये संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून 64 संघांनी सहभाग घेतला होता. श्रीराम स्पोर्ट्स क्लब, रिस्की बॉईज, साई समर्थ प्रतिष्ठान,डिफेंन्डर स्पोर्ट्स क्लब या संघांनी प्रथम चार बक्षिसे पटकावली. उत्कृष्ट फलंदाज शुभम गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज संदीप काळभोर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज पाटोळे, विशेष खेळाडू सचिन मोकाशी, विशेष सहभागी संघ ओम साई प्रतिष्ठान यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षिस वितरण समारंभास आम आदमी पार्टी प्रदेश संघटक विजय कुंभार, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप देसाई, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, संदीप सोनावणे यांच्या हस्ते सर्व ...
पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड पालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या आशीर्वादाने शहरात अवैध वृक्षतोड सुरू आहे का?

पिंपरी, ता १३ : पिंपरी चिंचवड शहरात दिवसाढवळ्या वूड माफिया ट्रक घेऊन रस्त्यावरील झाडं तोडत असतात आणि पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त हे मुग गिळून केलेल्या तक्रारींवर गप्प आहेत. असा सवाल वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केला आहे. निगडी येथील यामुनानगरमध्ये फोटोतील व्यक्ती अवैधरित्या वृक्षतोड करताना ऋषिकेश तपशाळकर यांना दिसला. ते बघताच त्यांनी त्याला हटकले आणि वृक्षतोडीची परवानगी मागताच तो तिथून पळून गेला. त्यामुळे पोलीस आणि पालिका आयुक्त अवैध वृक्षतोडीला संरक्षण देत आहेत का? आणि नाही तर इतक्या तक्रारी करून देखील दुर्लक्ष का केले जात आहे? टेम्पोचा नंबर वैध आहे का? आणि ही लाकडं जातात कुठं? कोण आहे माफिया, जो दोन्ही आयुक्तांनावर दबाब टाकत आहे? असे अनेक प्रश्न वृक्ष मित्र प्रशांत राऊळ यांनी उपस्थित केले आहेत....
विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली
पिंपरी चिंचवड, सामाजिक

विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली

उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन पिंपरी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी विशेष सहयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत अनेक सवलती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात रविवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शेकडो दिव्यांग मुलांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे सहसचिव मनोजकुमार बोरसे, ऋषाली बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, नंदकिशोर आहेर, समीना काझी, मच्छिन्द्र वीर, किरण जाधव, आ...
रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन

पिंपळे सौदागरमधील सर्व सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्रकल्प राबविण्याचा कुंदा भिसे यांचा संकल्प पिंपरी चिंचवड : झाडांचा जमिनीवर गळालेला पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दुसऱ्या प्लांटचे पिंपळे सौदागरमधील रोझ आयकॉन सोसायटीत आज उद्घाटन करण्यात आले. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी सदर प्लांटला भेट देऊन या प्लांटविषयी माहिती घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, रोझ आयकॉन सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे, पंकज देशमुख, गौरव पाटील, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, मोहित आगरवाल, शशिकांत शर्मा, विकास काटे, दिनेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कंपोस्ट प्रकल्प प्लांटमध्ये झाडांचा पाळापाचोळा, शेणखत, चहापत्ती या नैसर्गिक गोष्टींचेच मिश्रण करून खत तयार केले जाते. याला शासनाचा टेस्टिंग रिपोर्ट देखील मिळाला आहे. हे खत सोसायट्यांच...