निगडीतील विशेष विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मदत्त विद्यालयात कौशल्य विकास शाळा केंद्र सुरु
निगडी : विशेष विद्यार्थ्यांसाठी (मानसिक अपंग) ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे शाळा सरकारी निधीतून आणि एनजीओ द्वारे चालवली जाते. येथे हेंकेलचे अध्यक्ष सुनील कुमार यांच्या हस्ते कौशल्य विकास शाळेचे ब्रह्मदत्त विद्यालय, निगडी पुणे सिएसआर प्रकल्प म्हणून उद्घाटन केले.
यावेळी सीएसआर समिती सदस्य भूपेश सिंग, सौ.संध्या केडलया, सौ.कुंजल पारेख, मॅनेजर सचिन सपार, पी.के. वर्मा, शाळेतील शिक्षक, हेंकेल कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
मुळात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या विद्यार्थ्यांना सरकार मदत करत असते पण 18 वर्षानंतर विद्यार्थी त्यांच्या कुटुंबावर अवलंबून असतात. यासाठी आता शाळेत कौशल्य विकासाचे छोटे उपक्रम सुरू केले आहेत ज्यात हे विद्यार्थी समाजाला विविध सेवा देतील आणि बनवलेल्या वस्तूंची विक्री करतील. हेंकेल अध्यक्षांनी केलेल्या मशिनरींचे उद्घाटन केले, ज्यामध्ये फ्लोरिंग मिल, कापूर मश...