‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण
चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांचा उपक्रम
देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान मोदींचा व्हर्च्युअल संवाद
पिंपरी (दि. २७) : केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मंगळवारी (दि. २७) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरा बूथ, सबसे मजबूत' मोदी @ ९ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संघटनात्मक मंडळे आणि बूथवर देशभरातील सुमारे दहा लाख भाजप कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत त्यांना संबोधित केले.
भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी...