रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडी संलग्न कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे भव्य उद्घाटन

पिंपरी, दि.१७ (लोकमराठी) – पिंपरी शहरातील अजमेरा, मासुळकर कॉलनी येथील आय हॉस्पिटल समोर कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन आज महाराष्ट्र अध्यक्ष दक्षिण भारतीय बीजेपी मा. श्री राजेश आण्णा पिल्ले यांचे शुभहस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

चांगली सुविधा ह्या स्टॕडमुळे येणाऱ्या पेशंट व लोकांना मिळणार आहे. सुमारे रोज १० रिक्षा ह्या स्टॕडवर उभ्या असतील व वेळेत लोकांना रिक्षा वापर करता येईल. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री कै. माता हिराबाई किसन लांडगे यांच्या नावाने हा रिक्षा स्टॕड सुरू करण्यात आले आहे.

राजेशजी पिल्ले यांनी आपल्या भाषणात भविष्यकाळात रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या, अडचणी, व्यावसायिक मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतील असे आश्वासन दिले.

रिक्षा चालक हे आपला व्यवसाय कर असताना फार मोठी सामाजिक जबाबदारी ही निभावत असतात २४ तास नागरिकांना सेवा देण्याचे महत्त्वाचे कार्य रिक्षा चालक बांधव करत असतात. त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी पूर्ण ताकदीनिशी करण्यासाठी तयार आहे असे आश्वासन दिले.

त्याचप्रमाणे आरपीआय (अ) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी रिक्षा चालकांच्या दैनंदिन जीवनातील व व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र मदत करण्यास तयार असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपीआय (अ) वाहतुक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीजभाई शेख व कै.माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॕन्ड अध्यक्ष ईकबालभाई शेख यांनी कोरोना कालावधीत रिक्षाचालकांना केलेल्या अन्नधान्य वाटपाची सविस्तर माहिती यावेळी सांगितली. त्याचप्रमाणे ओला उबेर रॅपिडो यांच्या विरोधात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टातील लढाई जिंकल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली. कोर्टाच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडीने ओला उबेर रॅपिडो या बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या पुंजीपती कंपन्यांच्या वर बंदी घालण्यास यशस्वी झाले. आता पुढील कालावधीत रिक्षा चालकांनी आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी भाडे नाकारू नये, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, प्रवासी हेच आपले दैवत असून त्यांच्या अडीअडचणीला सुद्धा धावून जावे व रिक्षा स्टॅन्ड हे नागरिकांच्या साठी एक मदत केंद्र असावे अशा भावना व्यक्त केल्या.

उद्घाटन कार्यक्रमासाठी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष ईकबालभाई शेख व उपाध्यक्ष गोविंद पवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास मा. नगरसेवक राजेश पिल्ले, मा. शिक्षण मंडळ सभापती अर्जुन ठाकरे, शिवसेनेचे भोसरी विधानसभा समन्वयक गणेश जाधव, बीजेपी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष फारुख भाई इनामदार, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम साळवी, विद्यासागर गायकवाड व संगीत कट्टा प्रमुख शरद चव्हाण व रिक्षा स्टँडचे अध्यक्ष इकबाल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.