नेहरूनगरमधील नूराणी मशिद रस्त्याचा मार्ग मोकळा
पिंपरी (लोकमराठी) : नेहरूनगर येथील (सि.स.नं. 5016, 5015) नूराणी मशिद रस्ता जमीन वादात अडकला होता. मात्र, राजेंद्र गोळे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, पुणे यांनी नूराणी मशिद तर्फे दाद मागणाऱ्या अपिलदाराच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे मशिद रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत जिल्हा अधिक्षक पिठासनासमोर 2017 मध्ये अपिल करण्यात आले होते.
अपिल निर्णयात म्हटल्याप्रमाणे, नूराणी मशिद तर्फे याकूब सुलतान शेख व अकबर सुलतान शेख (दोघेही रा. स्वप्ननगरी, उद्यमनगर, पिंपरी), शहाजहान मेहबूब सय्यद (रा. स.न. 102, नूराणी मशिद, पिंपरी) यांनी खलीलखान मुनीरखान पठाण (रा. नेहरूनगर, पिंपरी), अभिलाषा इफ्रा डेव्हलपर्स तर्फे धर्मेंद्र पटेल (रा. 102, नूरमोहल्ला, नेहरूनगर, पिंपरी) व विशेष जिल्हा निरिक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी क्र. 3 पिंपरी चिंचवड द्वारा नगर भूमापन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांच्या विरोधात ज...