भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे विश्वासू व खंदे समर्थक अरुण पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राज्यभर भाजपला गळती सुरूच
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत विश्वासू व खंदे समर्थक भाजपचे सांगवी काळेवाडी माजी मंडल अध्यक्ष अरुण पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी उपसभापती राजू लोखंडे, वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, उद्योजक बालाजी पवार, शंकर तांबे, अमोल नागरगोजे, उद्योजक रवी बांगर, गोरख सानप, सामाजिक कार्यकर्ते किशोर आट्टरगेकर, अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई पठाण, विजय वडमारे (अध्यक्ष, धनंजय मुंडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर), सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर झुमके, सामाजिक कार्यकर्...