पुणे

पत्रकार शितल पवार यांना सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान
पुणे

पत्रकार शितल पवार यांना सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार प्रदान

पुणे : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीकडून दिला जाणारा सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादिका व पत्रकार शितल पवार यांना प्रदान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बचाव कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर शितल पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या की, हा माझा सन्मान नाही तर माझ्यासह काम करणाऱ्या प्राची, रश्मी, मीनाक्षी, अक्षता, महिमा, गायत्री, तनिष्का अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे. हा सन्मान म्हणजे जबाबदारी आहे, स्वातंत्र्याचा वसा आपल्या आजूबाजूच्या सर्व मैत्रिणींपर्यंत नेण्याची. याची लख्ख जाणीव पुन्हा एकदा झाली. मला खात्री आहे आम्ही सर्व मिळून ही जबाबदारी नक्कीच पार पाडू. आमच्या सभोवत...
समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख
पुणे, शैक्षणिक

समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – डॉ. विश्वास देशमुख

हडपसर (प्रतिनिधी) : आजच्या काळातही छत्रपती शिवरायांनी दिलेली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज आहे. शिवरायांनी प्रजेवर पुत्रवत प्रेम केले. रयतेच्या सुखासाठी त्यांनी त्याग केला. शिवरायांचा आदर्श आचरणातून दिसावा, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे डॉ. विश्वास देशमुख यांनीही मोलाचे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की ,समर्पण व त्यागाचे प्रतीक म्हणजे शिवराय होय. त्यागातूनच स्वराज्याची निर्मिती शिवरायांनी केली. हे स्वराज्य रयतेचे आहे. रयतेच्या कल्याणासाठी आपल्या आयुष्याचे समर्पण करणारे राजे रयतेचे झाले असे विचार डॉ.विश्वास देशमुख यांनी ओघवत्या शैलीत मांडले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. संजय जगताप उपप्राचार्य प्रा. संजय जडे आय. क्यु. ए. सी. चे प्रमुख डॉ किशोर काकडे...
वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणून अंधश्रद्धेला जीवनात स्थान देऊ नये | एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे प्रतिपादन
पुणे

वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणून अंधश्रद्धेला जीवनात स्थान देऊ नये | एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांचे प्रतिपादन

हडपसर (प्रतिनिधी) : पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करा. प्रदूषणमुक्त विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी विज्ञानाच्या प्राध्यापकानी प्रयत्न करावेत. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आचरणात आणावा. अंधश्रद्धेला आपल्या जीवनात स्थान देऊ नये. विज्ञानाच्या क्षेत्रात शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचे आपण कष्ट समजून घेतले पाहिजेत. काळानुरूप बदलणार्‍या संशोधन पद्धती आपण समजून घेतल्या तरच भविष्यातील संशोधनाची वाटचाल सुकर होईल, असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्टुडेंट टीचर असोसिएशन्स सेल व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी केमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. गजानन...
प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान
पुणे, शैक्षणिक

प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील वाणिज्य विद्याशाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन भानुदास भागवत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा. डॉ.अर्जुन भागवत यांचा संशोधनाचा विषय "शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या कल्पक प्रकल्पांचे व्यवस्थापन : एक तुलनात्मक अभ्यास " हा होता. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधील अकाउंटन्सी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर सानप यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यु .ए. सी प्रमुख प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन ...
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्रेमासिक सहविचार सभा संपन्न
पुणे, शैक्षणिक

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात त्रेमासिक सहविचार सभा संपन्न

पुणे : विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात शिक्षकांच्या प्रलंबित कामासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने माजी शिक्षक आमदार भगवान सोळूंके यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच त्रेमासिक सहविचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी करण्यात आलेल्या विविध विषयांवरील चर्चेदरम्यान प्रलबित प्रस्तावाचा ३१ मार्च २०२२ पूर्वी निपटारा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली. १. सहविचार सभाचे शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी, गट शिक्षण अधिकारी स्तरावर त्रेमासिक सहविचार सभा घेणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणे व सहविचार सभेचे आयोजन करणे. २. शिक्षणाधिकारी स्तरावरील प्रलंबित प्रस्तावाचा निपटारा मार्च २०२२ पूर्वी करणे. ३. मा. शिक्षणाधिकारी स्तरावरील सर्व प्रकारच्या प्रस्तावाच्या सादरीकरण पद्धतीमध्ये सुलभता, स्पष्टता, एकसूत्रीपणा निर्माण करणे. ४. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्...
सेवाभावी लोकांनी दुर्गम भागातील आदिवासींचे सक्षमीकरण करावे – डॉ. किशोर खिल्लारे
पुणे, सामाजिक

सेवाभावी लोकांनी दुर्गम भागातील आदिवासींचे सक्षमीकरण करावे – डॉ. किशोर खिल्लारे

वुई टू गेदर संस्थेतर्फे मावळमध्ये किराणा वितरण मावळ : पिंपरी चिंचवड मधील वुई टूगेदर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने मावळ तालुक्यातील सावळा, कुसवली गावात आदिवासी कुटुंबाना किराणा वितरण केले. संस्थेचे संस्थापक क्रांतिकुमार कडुलकर तसेच येथील आदिवासी कार्यकर्ते चंद्रशेखर खांडभोर, शांताराम हिलम सरपंच नामदेव घोंटे भाविन भंडारी,मेघना बेरी यांनी आदिवासीचे सक्षमीकरणासाठी शहरातील नागरिकांच्या या संस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित केला होता. आदिवासी समाज अतिदुर्गम भागात गरिबीचे जिणे जगत आहे. भूक, कुपोषण, अनारोग्य यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. डोंगराळ प्रदेशात त्यांना सेवा पुरवण्यासाठी मनुष्यबळ आणि पैशाची कमतरता असते. शहरातील संपन्न, समृद्ध दानशूर नागरिकांच्या योगदानातुन अन्नधान्य, खाद्यतेल, पौष्टिक डाळी इ जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणातून या कुटुंबाना सात्विक अन्न देता येईल. दु...
दिल्ली येथील आरडी परेडसाठी तेजस मोरे, संकेत यादव, ऋतुजा दळवी यांची निवड
शैक्षणिक, पुणे

दिल्ली येथील आरडी परेडसाठी तेजस मोरे, संकेत यादव, ऋतुजा दळवी यांची निवड

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील तेजस मोरे, संकेत यादव यांची २६ जानेवारी रोजी झालेल्या राजपथ परेडसाठी तर ऋतुजा दळवी हिची दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या प्राईम मिनिस्टर दिल्ली रॅलीसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कॅडेट्सला एन.सी.सी.चे लेफ्ट. प्रा. रमेश गावडे यांनी मार्गदर्शन केले. एन.सी.सी.च्या कॅडेट्सच्या या यशामध्ये महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचा मोलाचा सहभाग आहे....
एस. एम .जोशी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास राज्यस्तरीय व्याख्यानमाला संपन्न
पुणे

एस. एम .जोशी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास राज्यस्तरीय व्याख्यानमाला संपन्न

 हडपसर (प्रतिनिधी) : आजादी का अमृत महोत्सव व युवा सप्ताहानिमित्त एस. एम. जोशी कॉलेजमधील आय.क्यू.ए.सी. ग्रंथालय विभाग व हेरिटेज फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्यक्तिमत्व आणि कौशल्य विकास या विषयावर ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय व्याख्यानमाला दिनांक 14 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी या वयात अभ्यास करून आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर केले पाहिजे. समाजाची सेवा करायची असेल तर अधिकारी या पदावर जाण्याची गरज आहे. त्यातून आपण समाजाचे ऋण फेडू शकतो. असे विचार व्यक्त केले. हेरिटेज फाउंडेशनचे डायरेक्टर भुजंग बोबडे म्हणाले अभ्यासातूनच आपण आपल्याला सिद्ध केले पाहिजे. ग्रंथालयातील व ऑनलाईन पुस्तके वाचून...
हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा
पुणे, राजकारण

हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

पुणे : हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैन...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘काव्य संमेलन’ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘काव्य संमेलन’ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : कवितेमधून कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असतो. कवितेत एक अद्भुत शक्ती आहे. युवकांनी साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्य मनाची मशागत करते. आभासी विश्वातही कविता आनंद देत आहे. साहित्यिकांच्या सहवासात काव्य मैफिलीतून आनंद मिळतो. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या काव्य संमेलनात अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम व वैश्विक कला पर्यावरण औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हॉलंडचे सुप्रसिद्ध कवी व चित्रकार भास्कर हांडे यांनी या संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. या काव्य संमेलनात कवी अनंत राऊत (पुणे), कवी ज्ञानेश्वर तिखे (इंदोर), कवी बा...