पुणे

लेखक गिरीश कुबेर यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक
पुणे

लेखक गिरीश कुबेर यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांच्या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

राज्यातील सर्व आमदारांकडे विधानसभेत आवाज उठविण्याची निवेदनाद्वारे केली मागणी पुणे : विश्ववंद्य छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण लेखक गिरीष कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रेनेसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकातून संभाजी महाराज यांची नियोजनबद्ध आणि चाणाक्षपणे बदनामी केली आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांनी लिहिलेल्या “रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र” या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यातील सर्व आमदारांकडे निवेदनाद्वारे केलेली आहे. लेखक गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह ...
‘लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी’ या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन
पुणे

‘लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी’ या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन

हिंजवडी : 'लोकमित्र जेष्ठ नागरिक संघ, मारुंजी' या नोंदणीकृत संस्थेच्या नाम फलकाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी (ता. १९ डिसेंबर) मारूंजी येथील बुचडे वस्ती येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बुचडे होते. त्यावेळी मारुंजी गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य, गावचे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक ॲड. सुभाष जौंजाळे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य शंकरभाऊ मांडेकर यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी मान्यवरांनी खालीलप्रमाणे आपले मनोगत व्यक्त...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम .जोशी कॉलेजमध्ये पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालयातील हेल्थ सेंटर, नोबेल हॉस्पिटल ब्लड बँक व आपका डाॅक्टर फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ७२ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये ६६ विद्यार्थी व ८ विद्यार्थिनींनी रक्तदान केले. महाविद्यालयात शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच ...
आनंदी रहा व इतरांना आनंद द्या – डॉ. संजय कळमकर
पुणे, शैक्षणिक

आनंदी रहा व इतरांना आनंद द्या – डॉ. संजय कळमकर

हडपसर, २१ डिसेंबर (प्रतिनिधी) : सध्याचा काळ हा ऑनलाईन आहे. आभासी विश्व अवास्तव आहे. या आभासी जगात नात्यांचे विच्छेदन होत आहे. माणसाने वास्तवाला सामोरे गेले पाहिजे. आजच्या युवकांनी कौशल्य आत्मसात करून यशस्वी व्हावे. पुस्तकाच्या वाचनाने आपले मन प्रगल्भ होते. युवकांनी आपल्या आई-वडिलांनी केलेला त्याग समजून घ्यावा. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणजे आईच असते. आपल्याला कला येत नसेल तर इतरांच्या कलांचे कौतुक करा. आनंदी रहा आणि इतरांना आनंद द्या. अध्यापकांनीही प्रभावी अध्यापन होण्यासाठी वाचन, लेखन करावे. वाचन, लेखन केले तर सुखाबरोबर समाधानही मिळेल. असे विचार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कर्मवीर व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार...
एस. एम. जोशी महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

हडपसर (प्रतिनिधी) : स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे प्रतिमापूजन करून, ग्रामस्वच्छतेचे महत्त्व सांगितले. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गाव योजनेअंतर्गत मु. पो. पेठ (नायगाव) या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता केली. यावेळी महाविद्यालययातील प्रा.स्वप्नील ढोरे व डॉ.बाळासाहेब माळी यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कर्तुत्व व कार्याचा दाखला देऊन, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.रंजना जाधव, डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा.ऋषिकेश खोडदे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, ग्रंथपाल डॉ.शोभा कोरडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व वि...
शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असावा – प्राचार्य डॉ. दत्तात्रय तापकीर
शैक्षणिक, पुणे

शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आदर्श असावा – प्राचार्य डॉ. दत्तात्रय तापकीर

हडपसर ( प्रतिनिधी) : शिक्षक हा शिक्षणावर प्रेम करणारा असावा. लोकशाही संस्कृतीला पोषक नागरिक तयार करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. शिक्षकाने समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. पालक आणि शिक्षकांचे नाते दृढ व एकोप्याचे असावे. शिक्षक हा सामाजिक उपक्रमात सहभाग घेणारा व विद्यार्थ्यांचा आदर्श असावा. असे मत प्राचार्य डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमध्ये साधना शैक्षणिक संकुलाने आयोजित केलेल्या शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून "शिक्षण आणि समाजाप्रती शिक्षकाची भूमिका " या विषयावर बोलत होते. प्राचार्य डॉ. तापकीर यांचा सत्कार करताना रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष, आमदार चेतनदादा तुपे यांनी या उपक्रमासाठी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, सामाजि...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ संपन्न
शैक्षणिक, पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : शरदराव पवारसाहेब हे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी देशाच्या निर्णय प्रक्रियेत देशाचा जबाबदार पालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शैक्षणिक, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी चमकदार आहे. कृषी क्षेत्रातील नव्या अशा संशोधनाला पवारसाहेबांनी चालना दिली. तसेच उत्तम संघटन कौशल्य, संगणकीकरणाला प्रोत्साहन, विविध क्षेत्रातील आवड, प्रचंड जनसंपर्क असलेले शरदरावजी पवारसाहेब हे काळाच्या पुढे जाणारे व्यक्तिमत्व आहे. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी शरदरावजी पवारसाहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कर्मवीर व्याख्यानमालेत उद्घाटक म्हणून व्यक्त केले. प्रमुख पाहुणे डॉ. सदानंद भोसले यांच्या सत्कार करताना प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साधना शैक्षणिक संकुलाच्या वतीने शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसान...
शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना
पुणे, मोठी बातमी

शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना

पुणे शहर शिवसेनेतर्फे बंगळुरू येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध पुणे (प्रतिनिधी) : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचे पडसाद राज्यभरात उमटण्यात येत असून पुण्यात देखील शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे शहर शिवसेनेच्यावतीने कर्नाटकच्या अनेक बसेसना भगव्या रंगाने "छत्रपती शिवाजी महाराज की जय" लिहून व जयजयकार करून पुण्यातून कर्नाटकला राज्यात पाठवल्या आल्या. स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरिल खाजगी बस पार्किंगमध्ये उभ्या असणार्‍या कर्नाटक डेपोच्या अनेक एसटी बसेसला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
लेखक आत्माराम हारे यांना ‘उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार’ डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान
पुणे

लेखक आत्माराम हारे यांना ‘उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार’ डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान

पुणे : काव्यार्चना काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा रविवारी (ता. १२ डिसेंबर) मोठ्या उत्साहात येथे पार पडला. त्यावेळी पिंपळे गुरव येथील कवी व लेखक आत्माराम गोविंदराव हारे यांना कालकथित लक्ष्मीबाई गुलाबराव सोमकुंवर यांच्या स्मरणार्थ "उत्तम परीक्षक विशेष सन्मान पुरस्कार २०२१" प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्राचार्य हनुमंत धालगडे, प्रा. व्यंकटराव वाघमोडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केले होते. ...
एस. एम. जोशी महाविद्यालयात राष्ट्रीय मानवाधिकार दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी महाविद्यालयात राष्ट्रीय मानवाधिकार दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या, एस. एम. जोशी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रीय मानवाधिकार दिन" साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास विभागातील प्रा. दीपक गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मानवाधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. https://youtu.be/gr3-A7uWsq8 यावेळी बोलताना त्यांनी मानवाधिकाराचे घोषणापत्र वाचून दाखवले. तसेच मानवाधिकाराशी संबंधित अनेक घोषणा व नियमावलीचे व जाहीरनाम्याचे सविस्तर विवेचन केले. सन 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदीच्या तरतुदीमध्ये समाविष्ट केल्याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले. दरवर्षी जगभर 10 डिसेंबर हा दिवस 'मानवाधिकार दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागा...