पुणे

दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – आमदार शेळके
पुणे

दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – आमदार शेळके

तळेगाव दाभाडे (लोकमराठी) : दिव्यांगांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन मिळवून द्यायचे असेल तर लोकप्रतिनिधींनी शासनामार्फत सहकार्य केले पाहिजे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.कर्तव्य व सेवाभावनेतुन त्यांच्याकडे समाजातील प्रत्येकाने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. आज विश्व दिव्यांग दिनानिमीत्ताने आ. शेळके यांनी दिव्यांगांसोबत कार्ला येथे केक कापून दिव्यांग दिन साजरा केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य बाबुराव आप्पा वारकर, मा. प. समितीचे सदस्य दिपक हुलावळे, रा. काॅ. युवक अध्यक्ष सचिनभाऊ घोटकुले, रा. काॅ. सरचिटणीस सुदाम कदम, रा. कॉ. लोणावळा शहर अध्यक्ष जीवन गायकवाड. राजु देवकर मा.सरपंच दिव्यांग बांधव उपस्थित होते दरम्यान, आमदार सुनिल शेळके यांनी दिव्यांग ...
धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)
पुणे, मोठी बातमी

धक्कादायक : पैसे कमी दिल्याने सर्पमित्राने सोडून दिला विषारी नाग (व्हिडिओ)

तर दुसऱ्या घटनेत सर्पमित्राने नागांना दिले जीवनदान; दोन्हीही घटना पुण्यातील एका घटनेत वेगवेगळ्या सर्पमित्रांना एक बदनाम करणारा तर, दुसरा निसर्ग वाचविणारा पुणे (लोकमराठी) : एका सर्पमित्राने नागरिकांनी पैसे कमी दिल्याने पकडलेला साप व त्याच्याजवळील साप पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिल्याची घटना सोमवारी (ता. २५) हडपसरमध्ये घडली. तर या उलट काळेेवाडीत एका सर्पमित्राने जाळीत अडकलेल्या नागाची सुटका करत नागाला जीवनदान दिले. या दोन्हीही घटना पुण्यातील आहेत. पहिली घटना हडपसरमधील असून साप दिसल्याने स्थानिकांनी सर्पमित्र राजेंद्र परदेशी याला कॉल केला. सर्पमित्र घटनास्थळी आला आणि धामण जातीचा बिनविषारी साप पकडला. ठराविक कॉल चार्ज 200 रुपये असतो राजेंद्र ने 300 रुपयांची मागणी केली. त्यामुळे स्थानिकांनी 100 रुपये कमी दिल्याचा राग डोक्यात घेत दुसरीकडे पकडलेला नाग जातीचा विषारी साप आणि तेथे पकडलेल...
संविधान दिनानिमित्त शनिवारी पुण्यात संविधान जागर कीर्तन
पुणे

संविधान दिनानिमित्त शनिवारी पुण्यात संविधान जागर कीर्तन

पुणे, (लोकमराठी) : संविधान दिनानिमित्त लोकायत आणि जनता दल (सेक्युलर) यांच्या वतीने कीर्तनकार, ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे संविधान जागर कीर्तन (संत साहित्यातील संविधान मूल्ये) आयोजित केले आहे. पुणे-नवी पेठ येथील पत्रकार भवनात शनिवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजता हे कीर्तन होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूता ही मूल्य भारतीय संविधानाचा मूळ गाभा आहे. संविधानाची हीच मूल्ये आपल्याला वारकरी संत साहित्यात जागोजागी पाहायला मिळतात. इतर संत वचनांतूनही सामाजिक समतेचा विचार आलेला आहे. जात, पात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचा संदेश वारकरी संतांच्या साहित्यातून मिळतो. वारकरी संप्रदाय हा स्वातंत्र्य-समता-बंधुता यांचा आग्रह धरणारा पुरोगामी विचार आहे. वारकरी संतांच्या समतेच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटल...
महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
पुणे

महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पुणे (लोकमराठी) : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी (ता. 20) घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार काम करण्याच्या सूचना त्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल प्रिन्सिपल बॅच नवी दिल्ली, यांच्या आदेशान्वये मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय, जलप्रदूषण, जैव विविधता व जलविज्ञान या बाबींवर सनियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ, निरी संस्थेचे डॉ. रितेश विजय, जलसंपदा विभागाचे अधिकारी पी. के. शेलार, विभागीय आयुक्त कार्यालयाचे नगर प्रशासन वि...
रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 16 एजंटला अटक
पुणे

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 16 एजंटला अटक

पुणे, (लोकमराठी) : रेल्वेच्या एक्‍स्प्रेस गाड्यांचे अनधिकृतरीत्या आगाऊ तिकिटे काढून, त्यांची जादा दराने विक्री करणाऱ्या 16 एजंटांना रेल्वे पोलिसांनी (आरपीएफ) ताब्यात घेतले आहे. अनधिकृत एजंटांविरोधात रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या "ऑपरेशन धनुष्य' या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यात 16 एजंटांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 10 लाख 57 हजार 978 रुपयांची 358 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. सुट्टीकाळात रेल्वेची तिकिटे मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. सुट्टी आणि उत्सवाच्या काळात "आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावरुन तिकीट काढताना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो. त्यात रेल्वेने संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये सर्व तिकिटे विकली जातात. या कालावधीत एजंटाकडून खोट्या (फेक) आयडीच्या आधारे तिकिटे बुक करण्यात येत असल्याने तिकिटांचा कोटा लवकर संपतो. त्...
सामाजिक कार्यकर्ते धनराज सिंग चौधरी यांचा सन्मान 
पुणे

सामाजिक कार्यकर्ते धनराज सिंग चौधरी यांचा सन्मान

लोक मराठी : कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरीसाठी मानवी हक्कचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष धनराज सिंग चौधरी आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचा ‘कुलदीपक’ पुरस्काराने नुकताच सत्कार करण्यात आला. वस्ताद प्राध्यापक शिवाजीराव जयंतराव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त हांडेवाडी येथील समाधान लॉनमध्ये आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण आयोजक सचिन हांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते....
अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने केला खून; प्रियकरानेही आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय
पुणे

अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने केला खून; प्रियकरानेही आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय

मावळ (लोकमराठी) : अल्पवयीन प्रेयसीचा प्रियकराने ब्लेडने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजवर घडली. घटनेनंतर आरोपी प्रियकर फरार असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास वडगाव मावळ येथील निसर्गवारा लॉजमधील रुम नं.३०३ मध्ये प्रियकर श्रीराम सुग्रीव गिरी आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी थांबले होते. त्यावेळी अज्ञात कारणावरून आरोपी प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर ब्लेडने वार करून खून केला. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी श्रीराम हा घाईघाईत लॉजमधून जात असताना त्याने तेथील कर्मचाऱ्यांना आपली प्रेयसी तयारी करुन खाली येत असल्याचे सांगितले. त्यानंतर संधी साधून त्याने दुचाकीव...
‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना
पुणे

‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे (लोकमराठी) : गणेशोत्सव 'इको फ्रेंडली' साजरा करण्याकडे मागील काही वर्षांपासून पुणेकरांचा कौल वाढत आहे. अनेक नागरिक आपल्या घरातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करत आहेत. त्यात नितीन कुलकर्णी हे एक असून त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये सुंदर आणि पर्यावरणपूरक "बांबूच्या झोपडी'मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. कोथरूड येथील व्यावसायिक असलेले कुलकर्णी यांनी या वर्षी बांबूच्या पट्ट्यांपासून निर्माण केलेल्या चटईचा वापर करत "झोपडी' हा दहा फुटी देखावा साकारला आहे. देखाव्यासाठी वापरलेल्या सर्व गोष्टी या पर्यावरणपूरक असून झोपडीच्या छतासाठी गवताचा वापर केला आहे. तसेच देखावा सजावटीसाठी घरातील झाडांचा वापर करण्यात आला आहे. कोणतीही विद्युतरोषणाई न करता वातीच्या पंत्यांचा वापर सजावटीसाठी त्यांनी केला आहे. कुलकर्णी हे मागील चार वर्षांपासून वेगवेगळ्या विषयावर पर्यावरणपूरक गणपतीची सजावट करतात. कुलक...
मधूमेहमुक्त भारत अभियानात सहभागी होण्याचे डॉ. दीक्षितांचे आवाहन
पुणे

मधूमेहमुक्त भारत अभियानात सहभागी होण्याचे डॉ. दीक्षितांचे आवाहन

जुन्नर (लोकमराठी) : स्थूलत्व व मधूमेहमुक्त भारत अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारच्या स्थूलता विरोधी अभियानाचे ब्रँड अँबेसिडर प्रा. डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांनी शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथे बोलताना केले. श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांच्या ९० व्या जयंती निमित्त आयोजित अभिवादन सभेत चला आरोग्यावर बोलू काही' आपले आरोग्य आपल्या हाती या विषयावर ते बोलत होते. त्या वेळी भीमाजी गडगे, अतुल बेनके, पांडुरंग पवार,संजय काळे, शरद लेंडे, तान्हाजी बेनके, आशा बुचके, शशी सोनवणे,उदय भोपे, गुलाब पारखे,सुमित्रा शेरकर,योगिता शेरकर, शुभांगी लाटकर, ललिता चव्हाण,राजश्री बोरकर,उज्वला शेवाळे,अर्चना भुजबळ,सर्व आजी माजी संचालक,अधिकारी,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, आधुनिक जीवनशैली मुळे निर्माण होणार...
मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश ससार यांची फेरनिवड, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप पाटील बिनविरोध
पुणे, मोठी बातमी

मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश ससार यांची फेरनिवड, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप पाटील बिनविरोध

Lok Marathi News Network पुणे : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या पत्रकार संघ मुळशीच्या अध्यक्षपदी 'सकाळ'चे हिंजवडीतील बातमीदार रमेश ससार तर कार्याध्यक्षपदी 'लोकमत'चे प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. संघाच्या पौड येथील पत्रकार भवनात झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. संघाचे मावळते अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेला संघाचे माजी अध्यक्ष धोंडिबा कुंभार, संघाचे मार्गदर्शक दत्तात्रय सुर्वे, नीलेश शेंडे, बबन मिंडे, दत्तात्रय उभे, दत्तात्रय जोरकर, केदार कदम, रामदास दातार यांच्यासह नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - रमेश ससार (सकाळ), कार्याध्यक्ष - प्रदीप पाटील (लोकमत), उपाध्यक्ष - सागर शितोळे (पुढारी) व साहेबराव भेगडे (लोकमत)...