पुणे

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित
पुणे, राजकारण

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे 'आप' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले. खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवाडी येथी...
श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी, पुणे

श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता ८ जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपल्या फेसबुक पेजवरुन आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी बदनामी केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाने वाकड पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravi Shankar) यांच्या फेसबुक तथा युट्युब पेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र, अहमदनगरमधील एका खटल्याच्या निकालात न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ...
यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा
पुणे, मोठी बातमी

यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 'आरोग्यवारी' अभियानाचा पुण्यातून शुभारंभ यंदाची वारी ऐतिहासिक ठरणार .महिला वारकऱ्यांना विसावा कक्ष, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन यांची सुविधा मिळणार पुणे : महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते हे लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यां...
बार्टी व एमसीईडी तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात
पुणे, सामाजिक

बार्टी व एमसीईडी तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात

बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जाती स्वयं सहाय्यता युवा गटाला दिले जाणार महिनाभर प्रशिक्षण लोकमराठी न्यूज नेटवर्क शिवाजीनगर : बार्टी द्वारा स्थापित अनुसुचित जातीचा स्वयं सहाय्यता युवा गटातील युवक-युवतींकरिता एक महिना कालावधीचा मोफत (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे सोमवारपासून (ता. ६ जून) सुरूवात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे, पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) शिवाजीनगर, पुणे येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन बार्टीचे उपायुक्त उमेश सोनवणे, समतादूत विभाग प्रमुख नितीन सहारे, एमसीईडीचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड, प्रकल्प अधिकारी शितल बंडगर, प्रकल्प अधिकारी मनुकुमार शेळके, एमसीईडीचे प्रकल्प समन्वयक स...
पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश घोरपडे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र वाघ
पुणे

पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश घोरपडे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र वाघ

फुगेवाडी : पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा 'शिवसुमन' फुगेवाडी येथे नुकतीच घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी कामगारभूषण पुरुषोत्तम सदाफुले होते. ज्येष्ठ समाजसेवक पद्यभूषण आण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीस वर्षांपासून पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती सातत्यपूर्ण कामगारहित जोपासून कार्यरत आहे. यापुढील काळात गुणवंत कामगार शासनाकडे स्वतःसाठी काही न मागता निस्वार्थ बुद्धीने सामाजिक, शैक्षणिक मूल्यांचे जतन करून काम करीत राहतील असा विश्वास पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केला. सर्वानुमते अध्यक्ष म्हणून प्रकाश बाजीराव घोरपडे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र हिरामण वाघ यांची निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीस पदी सुरेश कंक, चिटणीसपदी संगीता श्रीकांत जोगदंड, उपाध्यक्ष पदी बाजीराव सातपुते व सुभाष चव्हाण, कोषाध्यक्ष पदी तानाजी एकोंडे, सह कोषाध्यक्ष पद...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन संपन्न
पुणे

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम.जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन कार्यक्रम सांस्कृतिक विभाग आणि स्टाफ वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी समतावादी आणि विषमतावादी भारतीय जीवन प्रवाहाचा आढावा घेतला. कर्मवीरांच्या आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागावरच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे. महात्मा फुले यांचे सत्यशोधक चळवळीची विचारधारा पुढे कर्मवीर आणि रयतमाऊली यांनी सुरु ठेवली. त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. असे विचार डॉ. दिनकर मुरकुटे यांनी व्यक्त केले. रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी केलेला त्याग रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत व बहुजन समाजासाठी खूप मोलाचा ठरला. लक्ष्मीबाई यांनी वसतिगृहातील सर्व मुलांची ...
पिंपरी चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाण्यावर तेलाचे तवंग ; यंदा पाण्याचा प्रश्न भेडसावणार?
पुणे, मोठी बातमी

पिंपरी चिंचवडची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाण्यावर तेलाचे तवंग ; यंदा पाण्याचा प्रश्न भेडसावणार?

File Photo पुणे : पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणातून निघालेल्या पाण्यावर तेलासारखा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तरंग दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्राह्मणोली, कोथर्न, येळसे, कडधे या भागातुन जाणाऱ्या पवना नदीवर हा तेलाचा तवंग दिसून येत आहे. पाण्यावर तेलाचा तवंग दिसून आल्यानंतर संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर धरणातील पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर केला जात असल्याने पाण्यात तेलाचा तवंग दिसत असल्याचे स्पष्ट केले गेले. पवना धरणातील (Pawana Dam) पाणी सोडण्यासाठी सध्या हायड्रोलिक यंत्रांचा वापर होतो. त्यामुळे पाणी सोडताना त्या हायड्रोलिक यंत्रे सुरु केल्यानंतर त्यातून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात तेल पाण्यात मिसळत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाण्यात तेल मिसळले जात असल्याने ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विषयाची आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभाग आणि आय.क्यु.ए.सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "न्यू होरायझनस ऑफ न्यानोसायन्स अँड एनर्जी रिसोर्सेस" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नामांकित संशोधक डॉ. न्यूएन स्ट्रॉंग कोरिया, डॉ. लीन न्यूएन युके ,डॉ. मोहशीन तांबोळी कोरिया, डॉ. जी.बी. कोळेकर कोल्हापूर ,आदी मान्यवरानी मोलाचे मार्गदर्शन केले. या परिषदेमधील मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी केले. या परिषदेचे उदघाटन सि-नेट पुणेचे प्रमुख डॉ. भारत काळे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी ऊर्जा, त्याचे संशोधन, अडचणी, त्यावरचे उपाय व भविष्यातील संधी यावर विचार व्यक्त केले. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष डॉ. निषाद देशपांडे आय.टी. सूरत यांनी भूषविले. या परिषदेमध्...
एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

https://youtu.be/ddFcpCEO7pk हडपसर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दिनांक 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 रोजी काळेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे या ठिकाणी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संगिताताई काळे, अमित झेंडे (सरपंच), योगेश काळे (ग्रामपंचायत सदस्य), श्रद्धाताई काळे दिवे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, एस एम जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. सात दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर प्रबोधनात्मक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रंजना जाधव यांनी 'महिला सुरक्षा' या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष म्हणून संगीताताई काळे उपस्थित हो...
शहरातील विद्यालयात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे वर्ग सुरु करणार : चंद्रशेखर जाधव
पुणे

शहरातील विद्यालयात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे वर्ग सुरु करणार : चंद्रशेखर जाधव

शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना युवक कॉंग्रेसचे अभिवादन पुणे : ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरुध्द लढत असताना स्वतःच्या प्राणाची आहुती देणा-या शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास त्यातील बलस्थाने आणि प्रेरणास्थाने नव्या पिढीने पुन्हा अभ्यासण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले. बुधवार (दि. २३ मार्च) ९१ व्या शहिद दिना निमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने राजगुरुनगर खेड येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव...

Actions

Selected media actions