शहरातील विद्यालयात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे वर्ग सुरु करणार : चंद्रशेखर जाधव
शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना युवक कॉंग्रेसचे अभिवादन
पुणे : ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेविरुध्द लढत असताना स्वतःच्या प्राणाची आहुती देणा-या शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचे बलिदान आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आज भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास त्यातील बलस्थाने आणि प्रेरणास्थाने नव्या पिढीने पुन्हा अभ्यासण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले.
बुधवार (दि. २३ मार्च) ९१ व्या शहिद दिना निमित्त पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने राजगुरुनगर खेड येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी शहिद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव...










