डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा व गोवा संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन
औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील मराठी विभागाने 'मराठी भाषा व गोवा संस्कृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातील सन्माननीय प्रा.चिन्मय घैसास सर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.चिन्मय घैसास सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचन लेखन आणि श्रवण कौशल्य अधिकाधिक विकसित केली पाहिजेत. त्यामधून आपला व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे आपले बोलण्याचे सामर्थ्य वाढते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण आपल्या मधील कौशल्य विकसित केले पाहिजेत. जर विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कौशल्य विकसित केले तर त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. गोवा हे पर्यटनाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी गोवा राज्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधून अनेक पर्यटक येतात. अशावेळी पर्यटकांना...