पुणे

Lok Marathi News Pune – Pune Marathi News by Lok Marathi News ( LokMarathi.in )

पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार
ताज्या घडामोडी, पुणे, महाराष्ट्र

पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार

काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार ठरणार, याबाबतचा घोळ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अखेर उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र उमेदवारी कधी जाहीर होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे. दरम्यान, प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाली. काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि...
मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागल...
मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा विजय शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ पिंपरी, 29 मार्च – बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष...
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
पुणे, महाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

सतरा शहरांचे तापमान चाळिशीपार राज्यात तापमानातील वाढ कायम असून, एकूण सतरा महत्त्वाच्या शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे. नगर येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूर येथे ४२.२ तापमान नोंदविण्यात आले. या दोन्ही शहरांसह जळगाव, मालेगाव, सांगली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, व...
संरक्षण सामुग्री उत्पादक देश म्हणून भारताचा उदय :  लष्करप्रमुख बिपीन रावत
पुणे, राष्ट्रीय

संरक्षण सामुग्री उत्पादक देश म्हणून भारताचा उदय : लष्करप्रमुख बिपीन रावत

पुणे : जागतिक दर्जाची संरक्षण सामुग्री वाजवी दरामध्ये भारताकडून बनविली जात आहे. जगाच्या क्षितिजावर संरक्षण सामुग्रीचे उत्पादन करणारा देश म्हणून भारत पुढे येतोय असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. औंध मिलिटरी सेंटर येथे आयोजित भारत व १७ आफ्रिकन देशातील सैनिकांच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी बिपीन रावत बोलत होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट सतींदर कुमार सैनी यावेळी उपस्थित होते. संयुक्त लष्करी सरावामध्ये १८० देशांनी सहभाग घेतला. या सरावामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया विविध देशांतील सैन्य अधिकाºयांचा बिपीन रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बिपीन रावत म्हणाले, भारत आणि आफ्रिकन देशांची देशाची विकासाची भागीदारी आहे. ही केवळ सुरूवात आहे, भविष्यातही ते सुरू राहील. आफ्रिकन देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी भारताने लक्ष केंद्री...
प्रसिध्द छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात निधन
पुणे

प्रसिध्द छायादिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात निधन

पुणे: मालिका,चित्रपट आणि माहितीपटांचे छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने बुधवारी (दि.२७) निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. तसेच माहेरची साडी, आत्मविश्वास, आमच्यासारखे आम्हीच, दोघी, अशा गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शन दुखंडे यांनी केले होते. हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिकेवरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्यावर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते. त्यात भूकंप, मजहब, गुलमोहर, अशा हिंदी , तर माहेरची साडी, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, मधुचंद्राची रात, आत्मविश्वास, आमच्या सारखे आम्हीच, दोघी, निष्पाप, वाजवा रे वाजवा, दे टाळी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. दुखंडे यांना ‘निष्पाप ’ या चित्रपटासाठी सर्वोत्त...
मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण
पुणे

मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली. राज्यलोकलेखा समितीचे अध्यक्ष अड. सचिन पटवर्धन यांच्या शिष्टाईने पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थांनी समेट घडवियात आला. मनोमिलनाला बारणे यांनी जगताप यांना लोटांगण घातल्याची चर्चा आहे.मावळ लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात आमदार जगताप सहभागी झाले नव्हते. उलट जगताप यांच्यासह समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध कर...
पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात
पुणे, महाराष्ट्र

पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात

सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे.  पुण्यातील जागेवरून काँग्रेसमध्ये मतभेदाला सुरुवात पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्यात अखेरचा खल सुरु झाला असून जोरदार संघर्षाला सुरुवात झाली आहे. सकाळी एका इच्छुकाला उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा असताना पुन्हा बैठक सुरु झाल्याने उमेदवार निवड पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर कोण आव्हान उभे करणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. पुणे लोकसभा मतदार संघ अनेकवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना अर्ज भरण्याची मुदत सुरु होऊनही त्यांना अजून उमेद...