पुणे

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेना 2 महाराष्ट्र बटालियन मार्फत सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने एकता शपथ, युनिटी रन व मार्च पास आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 25 कॅसेट्स सहभागी झाले होते. महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व कॅसेट्स युनिटी रन मध्ये अतिशय उत्साहात सहभागी होऊन एकतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन एन.सी.सी. विभागप्रमुख प्रा. के. बी. पठाडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा. स्वप्निल ढोरे, डॉ. सुनील खुंटे यांनी केले. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह' विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर श्री. दिलीप भुर्के यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन आणि वनखात्याचे कायदे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर, श्रीगोंदा कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के म्हणाले की, निसर्गाचे संवर्धन केले तरच वन्यजीवांचे संरक्षण होईल. त्यासाठी समाजामध्ये प्रबोधनाची गरज आहे. प्राणी व वनस्पती यांचे संवर्धन झाले पाहिजे. प्राण्यांच्या व वनस्पतीच्या सुरक्षेसाठी अभियानाची गरज आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारतीय...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कार्यालयीन सेवकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संपन्न 
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कार्यालयीन सेवकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम. जोशी कॉलेजमध्ये कार्यालयीन सेवकांसाठी तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रम स्टाफ वेल्फेअर कमिटी व स्टाफ अकॅडमी कमिटीने यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे यांनी डेड स्टॉक रजिस्टर मेंटेनन्स या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यालय हा महाविद्यालयाचा आरसा असतो. महाविद्यालयात उपयोगात न येणाऱ्या (डेड स्टॉक) वस्तूंची नोंद ठेवली पाहिजे. आपले कामकाज गतीने होण्यासाठी व्यवस्थित रेकॉर्ड नियोजन केले पाहिजे. असे मत डॉ. किशोर काकडे यांनी व्यक्त केले. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. के. बी. पठाडे यांनी 'सेफ्टी सेक्युरिटी स्किल्स' या विषयावर बोलताना म्हणाले की, प्रयोगशाळेत काम करताना विद्यार्थी व प्राध्यापकांनी कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. काही रसायने धोकादायक व प्राणघातक...
एस.एम. जोशी कॉलेजमध्ये एन.सी.सी. तर्फे ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये एन.सी.सी. तर्फे ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस.एम. जोशी कॉलेजमध्ये 'राष्ट्रीय छात्र सेने'च्या वतीने 'इंडियन स्वच्छता लीग' हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा, ओला व सुका कचरा याचे व्यवस्थापन कसे करावे. यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आपल्या आयुष्यात स्वच्छता कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले. सर्व छात्र सैनिकांनी महाविद्यालयाच्या परिसरातील स्वच्छता करून, ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे व्यवस्थापन केले. या उपक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे विभागप्रमुख प्रा.के.बी. पठाडे व सदस्य प्रा. स्वप्निल ढोरे यांच्यासह ४२ छात्र सैनिकांनी सहभाग घेतला. ...
एस.एम. जोशी कॉलेजमधील प्रा. डॉ. अतुल चौरे यांना पेटेंट
पुणे, शैक्षणिक

एस.एम. जोशी कॉलेजमधील प्रा. डॉ. अतुल चौरे यांना पेटेंट

प्रा. डॉ. अतुल चौरे हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजच्या मराठी विभागातील डॉ. अतुल चौरे यांना "विकसनशील अर्थव्यवस्थांमधील मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या आर्थिक कामगिरीवर कॉर्पोरेट गव्हर्नन्स धोरणे आणि पद्धतींचा प्रभाव" या विषयावरती पेटेंट मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल पश्चिम विभागाचे चेअरमन अँड. राम कांडगे, डॉ. राजेंद्र शर्मा, प्राचार्य डॉ.एन.एस. गायकवाड, प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अतुल चौरे यांची सन 2012 साली दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण केंद्र, येरवडा या ठिकाणी जेलर पदावर नियुक्ती झाली होती. सध्या ते रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या अगोदरही त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, महात्मा फुले कॉलेज पनवेल...
‘व्हिज्युअल आर्ट्स’ व साहित्य यांच्यात परस्पर संबंध – भास्कर हांडे
पुणे, शैक्षणिक

‘व्हिज्युअल आर्ट्स’ व साहित्य यांच्यात परस्पर संबंध – भास्कर हांडे

डाॅ. आंबेडकर महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाला प्रारंभ औंध, ता.१८ (प्रतिनिधी) : "व्हिज्युअल आर्ट्स' आणि साहित्य यांच्यात परस्पर संबंध आहे, ज्याचा अभ्यास होणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडील संत साहित्य हेही याचेच उत्तम उदाहरण आहे," असे मत आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्र-शिल्पकार भास्कर हांडे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या येथील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविद्यालयात श्री.हांडे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या 'व्हिज्युअल आर्ट्स'मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य.डाॅ.अरूण आंधळे, डाॅ.सविता पाटील, डाॅ.प्रभंजन चव्हाण, प्रा.बद्रीनाथ ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. हांडे पुढे बोलताना म्हणाले, "भारतीय परंपरेत चौसष्ठ कला आहेत. या सर्व कला संगीत, नृत्य, चित्र, मुद्रकला, ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन

हडपसर, दि. १७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे अल्युमनी असोसिएशन, प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे श्री. प्रवीण खिलारे, श्री.सागर ढेकळे व अवधूत राऊत उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनीसुद्धा भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न तरुणांच्या जीवावर पाहिले होते. आजच्या तरूणांनी स्कील बेस एज्युकेशन घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याकडील ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करावा. असे मत प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड साहेब यांनी व्यक्त केले. श्री.अवधूत राऊत यांनी विद्यार्थ्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जॉब फेअर 2022-23 चे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेज येथे प्लेसमेंट सेल आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने 'जॉब फेअर 2022-23 कंनेक्टींग टू फ्युचर' हा उपक्रम घेण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांच्या कल्पनेमधून सदर उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ॲकॅडमी मधील मा. अस्मिता राऊत उपस्थित होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी स्वतः मधील विविध स्किल डेव्हलप करायला पाहिजेत. तसेच इंग्रजी कम्युनिकेशन स्किल चांगले केल्यास त्यांना जगाच्या बाजारपेठेत मानाचे व सन्मानाचे स्थान प्राप्त होईल. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळेल. असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालय...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन संपन्न

हडपसर, 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. पद्ममणी कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते प्रा. डॉ. हनुमंत भवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्याने कोणते तरी ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी वाचन, लेखन, मनन व चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांची चरित्रे वाचणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळेल. वाचन हे माणसाला सक्षम बनवते व सत्याचा ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या वतीने 10 ऑक्टोंबर 2022 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जागृती व्हावी यासाठी PSY FUN कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. त्यामध्ये selfie Point, Psychological Movie, Posters, Lectures या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्वास्थ्य या विषयावरील पोस्टर तयार करून त्याचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. महेंद्र शिंदे सरांनी केले. तसेच यावेळी Selfie Point चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना Psychological Movie दाखविन्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पा...