एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह' विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर श्री. दिलीप भुर्के यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन आणि वनखात्याचे कायदे या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर, श्रीगोंदा कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के म्हणाले की, निसर्गाचे संवर्धन केले तरच वन्यजीवांचे संरक्षण होईल. त्यासाठी समाजामध्ये प्रबोधनाची गरज आहे. प्राणी व वनस्पती यांचे संवर्धन झाले पाहिजे. प्राण्यांच्या व वनस्पतीच्या सुरक्षेसाठी अभियानाची गरज आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, भारतीय तरुण...










