एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम.जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन कार्यक्रम सांस्कृतिक विभाग आणि स्टाफ वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी समतावादी आणि विषमतावादी भारतीय जीवन प्रवाहाचा आढावा घेतला.
कर्मवीरांच्या आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागावरच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे. महात्मा फुले यांचे सत्यशोधक चळवळीची विचारधारा पुढे कर्मवीर आणि रयतमाऊली यांनी सुरु ठेवली. त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. असे विचार डॉ. दिनकर मुरकुटे यांनी व्यक्त केले.
रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी केलेला त्याग रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत व बहुजन समाजासाठी खूप मोलाचा ठरला. लक्ष्मीबाई यांनी वसतिगृहातील सर्व मुलांची ...