रहाटणी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडीयम स्कूल येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त
संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महात्मा गांधी (Mahatma Gandhi) व लाल बहादूर शास्त्री (Lalbahadur Shastri) यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व आरोग्य निरिक्षक प्रणय चव्हाण, भुषण पाटील यांनी केले. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिम्मित स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांना घरी किंवा घराचे परिसरात बंदी असलेले प्लास्टिक गोळा करून ते शाळेत जमा करण्याबावत आवाहन करण्यात आले .
तसेच शाळा परिसराची स्वच्छता करून शाळा ते शिवार चौक ते शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छता मोहिमेचे बॅनर व झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ पिंपरी चिंचवड सुंदर पिंपरी चिंचवड, साफ सफाई करूया बिमारी हटवूया. पुढील पिढीसाठी चांगली देणं माझा परिसर स्वच्छ ठेवेन असे घोषवाक्य देऊन रहाटणी (Rahatni), पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) मध्ये स्वच्छता मोहिमेमार्फत जनजागृती करण्यात केली.
यावेळी शाळेतील पाचवी ते दहावी विदयार्थी, शिक्षक व आदित्य ओव्हाळ, अक्षय पाटील, अनिकेत खरात आकाश बंदपाटे, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृन्द हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण चाबुकस्वार यांनी स्वच्छतेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शेन केले व महापुरुषांच्या कार्याबद्दलची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय इंगळे या विद्यार्थ्याने केले तर समृद्धी जगताप, राहुल चौधरी, दानिश रझा, या विद्यार्थिनी या महापुरुषांबद्दल भाषण केले व आभार वैष्णवी गवळी यांनी केले.