एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू – प्राचार्य डॉ. पंडित शेळके

एन.एस.एस. सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू - प्राचार्य डॉ. पंडित शेळके 

पिंपरी : महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेतील सहभाग हा सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, चार भिंतीच्या आतील शिक्षण महाविद्यालयात मिळते, तर चार भिंतीच्या बाहेरील समाजशिक्षण राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून कार्य करताना मिळते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचार व कार्याचे दाखले देत सामाजिक बांधिलकी व सामाजिक सामिलकीचे धडे राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळतात असा मनोदय व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप नन्नावरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉ. भारती यादव यांनी करून दिला. कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. माधव सरोदे, कला शाखाप्रमुख डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. शहाजी मोरे, वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. अनिकेत खत्री, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, प्राध्यापक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ. मिलिंद भंडारे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संग्राम गोसावी यांनी केले.