HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

HOLI : होळी करा लहान; पोळी करा दान। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

पिंपरी , दि. १० – “होळी लहान करा, पोळीचे दान करा,” हे संदेश देत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेने होळी सणाच्या निमित्ताने एक सामाजिक उपक्रम आयोजित केला आहे. समितीने अपशब्द आणि शिव्या यांचे दहन करून, चांगल्या गोष्टी व विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले आहे.

होळीला वाहण्यात येणारी पोळी संकलित करण्याचा उपक्रम अंनिसच्या वतीने २६ वर्षांपासून देहूरोड येथे यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संकलित केलेली पुरणपोळी देहूरोड येथील गरीब वस्तीमध्ये ग्रामस्थांकडून वाटप केली जाते.

या वर्षीही नागरिकांना पर्यावरणपूरक, साधेपणाने घरगुती होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देहूरोड येथील चिंचोली येथील पोळी संकलन उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या सामाजिक कार्यात हातभार लावावा, असेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे. समितीच्या या उपक्रमामुळे होळीच्या सणासोबत एक सकारात्मक संदेश दिला जात आहे, जो समाजातील एकोपा आणि सद्भावना वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

Actions

Selected media actions