एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अंध, अपंग मुली-मुलांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शनपर सामाजिक कार्य केल्याबद्दल पुण्यातील समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल यांच्या वतीने मानसशास्त्र विभागाला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

एस. एम. जोशी कॉलेजमधील मानसशास्त्र विभागाचा सामाजिक कार्याबद्दल गौरव 

त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. महेश देवकर, प्रा. शिल्पा कुंभार व मानसशास्त्र विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. शुभम तांगडे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.