श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप

चिंचवड (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजूंनी समाधान व्यक्त केले. जास्तीत नागरिकांनी आपल्या आसपासच्या गरजूंना अन्नधान्य वाटप करावे. असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या देशावरती कोरोना विषाणुच्या भयंकर संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामूळे बहुसंख्य लोकांना आपला रोजगार सोडून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मसाला, गूळ असे अन्नधान्याचे किट देण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे व मंगेश पाटील यांच्या हस्ते गरजू व्यक्तीला धान्य किट देण्यात आले.

Actions

Selected media actions