HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.

HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.

हडपसर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे,एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे- २८ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० मार्च २०२५ रोजी जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्रो.डॉ. संगीता अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप हे होते.

सत्र-१ ले

पहिल्या सत्रात प्रो.डॉ. संगीता अहिवळे यांनी ‘लिंगभाव व जैविक वास्तव’ या विषयावर उपस्थित महाविद्यालयातील राष्ट्रीय एक दिवसीय मार्गदर्शन केले. आपल्या विषयाला अनुसुरून त्यांनी जैविक दृष्ट्या लिंग व सामजिक दृष्ट्या लिंगभाव ही संकल्पना सविस्तर सांगून विज्ञानवादी दृष्टी विकसित करण्यासाठी विज्ञानवादी दृष्टीकोनाचे महत्व अधोरेखित केले.

दुसरे व्याख्यान प्रो. डॉ. कामायनी सुर्वे यांचे ‘लिंगभाव संवेदनीकरण’ या विषयावर झाले. मार्गदर्शन केले त्यात त्यांनी लिंगभाव म्हणजे काय हे सांगून स्त्रीप्रतीमेचे विविध आयाम ,अदृश्य श्रम, कायदे विषयक तरतुदी, ग्रामीण समाजातील वास्तव इत्यादी विविध आयामी विवेचन केले.

सत्र-२ रे

दुसऱ्या सत्रात डॉ. ललित भवरे यांनी ‘लिंगभाव समजून घेताना ..’ या विषयावर विवेचन केले. या विवेचनात त्यान समकालीन सामाजिक वास्तवावर भाष्य करून स्त्रीप्रश्नाचे स्वरूप स्पष्ट केले. आधुनिक सामाजिक समतेची मानसिकताच लिंगभाव संवेदनशील बनवू शकते असे सांगितले.

या सत्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सविस्तर चर्चेत सहभाग घेऊन ‘लिंगभाव’ या संकल्पनेशी निगडीत विविध प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या शंका विचारल्या सर्व प्रश्नाचे उत्तरे उपस्थित मान्यवरांनी दिले.

समारोप सत्र

समारोप सत्रात प्रमुख पाहून म्हणून डॉ. मारुती केकाणे यांनी या कार्यशाळेचे महत्व विषद करून कायदेशीर तरतुदीचे विवेचन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. किशोर काकडे यांनी भूषविले. या कार्यशाळेत प्रा. संजय जडे , प्रा. संजय अहिवळे, प्रा. किसन पठाडे, डॉ. शीतल कोरडे, प्रा. दीपक गायकवाड, व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे ११० स्वयंसेवक सहभागी झाले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना पाटील व डॉ. नम्रता कदम याने केले. प्रमुख पाहुण्यांचे परिचय प्रो.डॉ. दिनकर मुरकुटे व डॉ. निशा गोसावी यांनी करून दिला तर आभार प्रा. ऋषिकेश खोडदे यांनी मानले.