शहरात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा – मनीषा गटकळ यांची मागणी

शहरात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा - मनीषा गटकळ यांची मागणी

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक नगरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. परंतु याच औद्योगिक नगरीमध्ये वाहतूक व्यवस्था ही संपूर्णपणे ढिसाळ झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर आणावी यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल च्या वतीने उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

प्रदेशाध्यक्षा आणि खासदार अडव्होकेट सौ.वंदनाताई चव्हाण यांचे आदेशानुसार आणि शहराध्यक्ष आदरणीय अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने,काम करत असत्ताना शहरात बंद असलेले आणि ब्लिंकर झालेल वाहतूक दिवे त्वरित चालू करावेत तसेच पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा वेळ वाढवून दयावा, 10 सेकंद ऐवजी ज्या सिग्नल च्या जवळ शाळा,आहेत त्या ठिकाणी महिला आणि मुलांचा विचार करुण तो 25 सेकंदाचा करावा, तसेच जेष्ठ नागरिकांचा विचार करुण काही ठिकाण चा वेळ 15,ते 20 सेकंड करावा.

अति उत्साही लोक सिग्नल तोडूंन फ़ास्ट जातात त्यामुळे अपघात होतात त्यावर ट्रैफिक पोलिसांच नियंत्रण असाव, पदपथाचे दिवे चालू असावेत, आशा अनेक मागण्या करत, राष्ट्र्वादी अर्बन सेलच्या शहराध्यक्षा मनिषाताई गटकळ या जबाबदारीने वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त आनंदजी भोईट सर यांच्याकड़े निवेदन पत्रव्दारे मागणी केली. निवेदन देताच उपायुक्त आनंद भोईट यांनी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देऊन त्यांनी तत्काळ आमच्या समोरच त्याचे सर्व यंत्रणाव्दारे काम करण्याचे आदेश दिले.

सदर निवेदन देताना अर्बन सेल निरीक्षक,आणि झोपड़पट्टी सेल आध्यक्षा,-सुनीता अडसुळ, अर्बन सेल निरीक्षक,-मिरा कुदळे, अर्बन सेल जेष्ठ नागरिक कमिटी समन्वस्यक- संगिता गोडसे, अर्बन सेल शहर सुधार कमिटी समन्वयक- बबिता बंनसोडे, अर्बन सेल युवती कमिटी समन्वयक- मीरा कांबळे, झोपडपट्टी सेल च्या पिपरी विधानसभा अध्यक्षा शिला गायकवाड़, इत्यादी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.