- रक्तदान शिबीर, सोलो डान्स स्पर्धा व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमराठी न्यूज नेटवर्क
काळेवाडी : सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका उषामाई काळे व दिलीप आप्पा काळे यांच्या संयोजनातून भव्य रक्तदान शिबीर, सोलो डान्स स्पर्धा व महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग दोन दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मधुकर नाना काळे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, नगरसेवक नाना काटे, संतोष कोकणे, विनोद नढे, नगरसेविका उषामाई काळे व नीता पाडाळे, नवनाथ नढे, विजय सुतार, गणेश कस्पटे, गोरख कोकणे, संगिता कोकणे, शरद म्हस्के, संजय पगारे, हरेश नखाते, मारूती आटोळे, एकनाथ काटे, नाथा काळे, माऊली काळे, नेताजी नखाते, निवृत्ती नखाते, विजय काळे, तानाजी काळे, ज्ञानेश्वर नढे, प्रकाश नढे, राजू केदारी, शिवाजी काळे, प्रविण धरडे यांच्यासह सोनिगरा ज्येष्ठ नागरिक संघ व काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते.
बुधवारी (ता. १०) झालेल्या रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. तर सायंकाळी स्ट्रीट मूव्हमेंट डान्सिंग स्टुडीओ यांच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या सोलो डान्स स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना पारितोषिके, रोख रक्कम आणि सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू व मिठाई वाटप करण्यात आली.
गुरूवारी (ता. ११) सायंकाळी महिलांसाठी आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमातील पहिल्या क्रमांकास टिव्ही संच, दुसर्या क्रमांकास फ्रिज, तिसऱ्या क्रमांकास वॉशिंग मशीन, चौथ्या क्रमांकास ओव्हन मशिन व पाचव्या क्रमांकास मिक्सर आदी बक्षिसांसह पैठणी देण्यात आली. तसेच सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.