पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरमच्या जॉय ऑफ लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत, महानगरपालिका व निसर्गराजा मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गो-खाद्य रूपाने गोसेवा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महनगरपालिकेचे वरिष्ठ अभियंता प्रवीण लडकत यांनी महपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यथोचित माहिती दिली आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले. स्लाईड शो सहित प्रत्यक्ष शुध्दीकरण केंद्र बघितल्यावर उपस्थितांचा महापालिकेबद्दलचा आदर द्विगुणित झाला.
उपिस्थितांनी उत्स्फूर्तपणे पाणी वाचवण्याची शपथ घेतली. जल शुध्दीकरण केंद्राची सफर मनीषा हींगणे यांनी घडवली. “हे काम माझ्या एकट्याचे नसून पूर्ण माझ्या पूर्ण टीमचे कार्य आहे, आम्हास आलेल्या यशास टीमचे मोलाचे सहकार्य आहे.” असे मनोगत प्रवीण लडकत यांनी व्यक्त केले.
“जलशुध्दीकरण केंद्राच्या कार्याने आम्ही भारावून गेलो.” असे मनोगत प्रेसिडेंट मनोज मालपाणी आणि डायरेक्टर श्रीकुमार मारू यांनी व्यक्त केले.” केलेली गो-सेवा आम्ही केली नसून निसर्ग देवतेने आमच्याकडून करवून घेतली असे.” मनोगत डायरेक्टर डॉ. संदीप यांनी व्यक्त केले. फुलपाखरू तज्ञ श्री भागवत यांनी उपस्थितांना फुलपाखरू व फुलपाखरू उद्यानाची माहिती देवून फुलपाखरू संरक्षणाचे धडे दिले.
निसर्ग राजा मैत्र जीवांचे माणिक धर्माधिकारी, अतुल वाघ, सागर वाघ यांनी झाडांचे रोपटे पुरवले. कार्यक्रमच सूत्रसंचालन रुपली सोनी यांनी केले. नियोजन गोविंद सोनी आणि जॉय लाईफ टीमने केले, तर आभार प्रदर्शन श्रीकुमार मारू यांनी केले.