चिखलीत आढळला विषारी साप | सर्पमित्राने सुखरूप सोडले निसर्गाच्या सान्निध्यात (Video)

पिंपरी : सर्पमिञ वैभव कुरुंद यांना चिखलीतील नेवाळेवस्ती परिसरातून संतोष यांनी साप आढळल्याची माहिती दिली. करूंद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तो मन्यार जातीचा विषारी साप असल्याचे त्यांना समजले. मोठ्या शिताफीने या सापाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

करूंद यांनी पकडलेला साप तीन फुट लांबीचा होता. सापाचा रंग निळसर काळा आणि त्यावर सुमारे ४० पातळ पांढरे आडवेपट्टे होते. मन्यार साप हा भारतीय उपखंडातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असून हा सरासरी ८ ते १२ अंडी घालतो. असे करूंद यांनी सांगितले.

चिखलीत आढळला विषारी साप | सर्पमित्राने सुखरूप सोडले निसर्गाच्या सान्निध्यात (Video)

Actions

Selected media actions