
हडपसर, ९ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवशीय “युवक - युवती उन्नयनीकरण कार्यशाळेचा समारोप समारंभ संपन्न झाला. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी महानगरामधून गावामध्ये जातात. आणि त्या ठिकाणी निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करतात. निस्वार्थ भावनेने गावामध्ये केलेले कार्य पुढे आयुष्यभर समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. असे मत डॉ.सदानंद भोसले यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी तीन दिवसीय कार्यशाळे सहभागी झालेल्या वक्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत डॉ.अभिजीत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हा महाविद्यालयाचा कणा आहे. भविष्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी समाजामधील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करतात. असे मत प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.नाना झगडे (अण्णासाहेब मगर, महाविद्यालय, हडपसर) उपस्थित होते. त्यांनी “सत्यशोधक परंपरा आणि स्री-पुरुष समानता” या विषयावर बोलताना पारंपरिक संस्कृतीतून आलेली गुलामागिरी नष्ट केली पाहिजे. असे आपले मत व्यक्त केले. प्रा.दिनेश पवार यांनी “युवक-युवती व स्पर्धा परीक्षा” या विषयावर मार्गदर्शन केले. युवकांनी अशक्त झालेली मने सशक्त करून आपले उचित ध्येय साध्य करावे. असे मत व्यक्त केले. प्रो.डॉ.प्रभंजन चव्हाण (डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध) यांनी “लिंगभाव समानता” या विषयावर मनोगत व्यक्त केले. तर प्रो.डॉ.सुभाष वाघमारे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा) यांनी “युवक युवती उन्नयनीकरण व संविधान” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजच्या युवकांनी संविधान समजून समजून घेऊन सामाजिक कार्य केले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे यांनी केले. तर पाहुण्यांचा व अध्यक्षांचा परिचय डॉ.निशा गोसावी यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.ऋषिकेश खोडदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.नम्रता कदम व प्रा.अमोल पवार यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रो.डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, डॉ.हेमलता कारकर, प्रा.संजय अहिवळे, प्रा. किसन पठाडे, प्रा.दत्ता वासावे, प्रा.स्वप्नील ढोरे महाविद्यालयातील प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.