नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

नवरात्रीनिमित्त 'नऊ दिवस, नऊ सन्मान' अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
  • पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ या उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याअंतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने कु. संस्कृती गोडसे (सामाजिक क्षेत्र), कु. अंकिता नगरकर (वैज्ञानिक क्षेत्र), कु. खुशी मुल्ला (क्रीडा क्षेत्र), मोनिका गोळे-पेंढारकर (लोककला क्षेत्र), अमृता ओंबळे (कला क्षेत्र), प्राजक्ता रुद्रवार (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. जागृती चव्हाण (वैद्यकीय क्षेत्र) आणि रेनी सजी (उद्योजक क्षेत्र) या रणरागिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कारमूर्तींना गौरवपत्र देण्यात आले.

या प्रसंगी प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, कार्यक्रमाचे आयोजक उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, सोशल मिडिया समन्व्यक जय ठोंबरे, चिंचवड विधानसभा सरचिटणीस सचिन सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमासंदर्भात बोलताना आयोजक चंद्रशेखर जाधव म्हणाले की, ” या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे म्हणजे साक्षात आदीशक्तींचा सन्मान आहे. या नवदुर्गांनी आपआपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. हे सामान्या मधले असामान्य व्यक्तिमत्व आहे. अशा कर्तृत्ववान महिलांचे कार्य नवीन पिढीसाठी व मुलींसाठी सतत प्रेरणा देणारे आहे. यातून त्यांनाही चांगले कार्य करण्याची नवी ऊर्जा मिळेल.”

Actions

Selected media actions