पिंपरी (लोकमराठी) : विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातांवर व भगिनींवर विशेष मुलांना सांभाळण्याची मुख्यत्वे जबाबदारी असते. त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांचे स्वतःसाठी एक दिवस त्यांना मुक्तपणे संवाद व संचार करण्यासाठी मिळावा म्हणून विशेष मुलांच्या माता व भगिनींसाठी सदर सहलीचे आयोजन अंजनवेल कृषी पर्यटन मुळाशी, पुणे येथे दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते.
सदर उपक्रमांतर्गत जवळपास अनेक विशेष मुलांच्या माता आणि बहिणींचा संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषण मुक्त वातावरणात, आनंदात तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत पार पडला.
विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातां व भगिनी यांनी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व कुंदाताई भिसे यांचे मनापासून आभार मानले. अनेक महिला आयोजकांचे व व्यवस्थापकांचे आभार मानताना भावुक झाल्या, वर्षातले 365 दिवस कुटुंबासाठी देत असताना एखादा दिवस तरी स्वतःसाठी मिळावा अशी माफक अपेक्षा काही विशेष (दिव्यांग) मुलांच्या महिला पालकांनी व्यक्त केली.
विशेष (दिव्यांग ) मुलांच्या मातांचे मनोगत :
“मैत्री दिनाच्या सर्वाना शुभेच्छा ! जसे शाररिक स्वस्थासाठी सात्विक भोजनाची गरज असते तसेच मानसिक स्वस्थासाठी खूप चांगल्या मित्र-मैत्रीनींची गरज असते. आज मैत्री दिनानिमित्त चांगल्या मैत्रिणीची ओळख झाली यांचा मला मनापासून आनंद वाटतो याचं क्रेडिट गोज टू सप्तर्षी आणि उन्नती फॉउंडेशन याना जात थँक्यू सो मच, माझं नाव ज्योती आहे आणि सर्वसामान्य समाजात माझ्या श्वासांच्या क्षणापर्यंत दिव्यांगांची सेवाकरण्याची ज्योत अखंड ठेवत राहील”
-ज्योती आगरकर
“गेली १०वर्षातून स्वतःसाठी पहिल्यांदा मी घरा बाहेर आले,मला खूप आनंद होतोय ! आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप अडचणी व संघर्ष असून आपल्या मुलांनी आपल्याला एक नवीन जग दाखवलं आपल्याला लढायला शिकवलं, त्यातून आपण इतके खुश आहोत ही एक आपली कॉलिटी आहे! मी सप्तर्षी आणि उन्नती फॉउंडेशनचे मनापासुंन खूप खूप आभार मानते !”
-ज्योती जाधव
“मला खूप आनंद झाला, आपण महिला कुठे मिक्स होत नाही कारण आपली मूल विशेष असल्यामुळे मनात एक शल्य असत पण मला एवढं सांगणं आहे माझ्या मैत्रिणींना आपण असच ६ महिन्यातून इथे येऊन एक-मेकींशी बोलुन मन मोकळं केलं पाहिजे आणि ही संधी आपल्याला सप्तर्षी आणि उन्नती फॉउंडेशन यांनी दिली त्याचे खूप आभार मानते आणि मी शुभेच्छा देते की असंच कार्य त्यांच्या हातून घडतं राहावे !”
-संगीता भदाणे
या उपक्रमाचे आयोजन संजय भिसे (संस्थापक, उन्नति सोशल फॉउंडेशन), कुंदाताई भिसे (अध्यक्षा,उन्नति सोशल फॉउंडेशन) यांच्या पुढाकाराने झाली झाले. दिव्यांग बांधवांच्या व पालकांच्या उन्नतीसाठी उन्नती फाउंडेशन सदैव प्रयत्न करत आहे प्रयत्न करत राहण्याचे आश्वासन संजय भिसे यांनी दिले तसेच सदर सहलीचे व्यवस्थापन सप्तर्षी फॉउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
सप्तर्षी फॉउंडेशनच्या वतीने मनोजकुमार बोरसे (संथापक सचिव,सप्तर्षी फॉउंडेशन), रुषाली बोरसे (प्रशासकीय प्रमुख,सप्तर्षी फॉउंडेशन) यांच्या उपस्तिथित सहलीचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या पार पडले तसेच सप्तर्षी फॉउंडेशचे कर्मचारी अक्षय वऱ्हाडे व प्रथमेश कदम यांनी देखील नियोजनात मोलाचा वाटा उचलला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ढगे यांनी पार पाडले.
राहुल जगताप (संस्थापक अंजनवेल कृषी पर्यटन) यांचे सर्वांनी विशेष आभार मानले.